शेकोट्यांभोवती रंगू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:32 AM2021-01-04T04:32:34+5:302021-01-04T04:32:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वरकुटे मलवडी : माण तालुक्यात थंडी कायम असून गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. या शेकोटीभोवती राजकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे मलवडी : माण तालुक्यात थंडी कायम असून गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. या शेकोटीभोवती राजकीय गप्पा रंगत आहेत.
माण तालुक्यात कमी-अधिक फरकाने थंडी कायम आहे. त्यामुळे नागरिक रात्रीच्या सुमारास स्वेटर घालून व कानटोपी, मफलर बांधून थंडीपासून संरक्षण करत आहेत. मात्र, पहाटेच्या सुमारास थंडी अधिक जाणवते. अशावेळी गावा-गावांत शेकोट्या पेटविण्यात येत आहेत. या शेकोटीभोवती अबाल-वृध्द बसून थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या गप्पांचा फडही रंगत आहे.
.................................................
थंडीचा गहू पिकाला फायदा
लोकमत न्यूज नेटवर्क
दहीवडी : माण तालुक्यात सध्या थंडी वाढू लागली आहे. या थंडीचा गहू पिकाला फायदा होईल, असे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे.
माण तालुक्यात रब्बी हंगामामध्ये सर्वाधिक ज्वारीचे पीक घेण्यात येते, तर गहू, हरभरा अशी पिकेही घेण्यात येतात. सध्या गहू पीक चांगल्या स्थितीत आलेले आहे. शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देणे सुरू केले आहे. त्यातच थंडी पडत असल्याने गहू पिकाला फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे.
.....................................