‘पळशीच्या पीटी’ची सातासमुद्रापार धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:53 PM2018-04-01T22:53:13+5:302018-04-01T22:53:13+5:30
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : तसं पाहिलं तर फलटण तालुक्यातील बराचसा भाग हा दुष्काळी. कधी खायलां हाय तर पाणी नाय, अशी काहीशी परिस्थिती. अशा दुष्काळी तालुक्यातील आदर्की या गावी राहणारे धोंडिबा कारंडे यांनी साताऱ्याच्या मातीत सिनेमाच्या रुपाने तयार केलेल्या ‘पळशीची पीटी’ या कलाकृतीने आज सातासमुद्रापार धाव घेतली आहे. या मराठी चित्रपटाची फ्रान्स येथे होणाºया कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून, या महोत्सवात झळकणारा साताºयाचा हा पहिलाच चित्रपट आहे.
मुंबई, पुण्याकडची सिनेसृष्टी गेल्या काही वर्षांत साताºयाकडे सरकू लागली असाताना आता मराठी सिनेमाही कात टाकू लागला आहे. वर्षभरापूर्वी मोहीच्या ललिता
बाबरने रिओ आॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करून जगाचे लक्ष वेधले. धोंडिबा कारंडे यांनी हाच
धागा पकडून सिनेमा करण्याचे ठरविले. एका धनगराच्या कुटुंबातील ‘भागी’ या धावपटू मुलीची अडथळ्यांची शर्यत त्यांनी चित्रपट रुपाने पडद्यावर आणली. प्रचंड कष्ट, ओढाताण करून त्यांनी ‘पळशीची पीटी’ हा सिनेमा त्यांनी पूर्ण केला.
याचे संपूर्ण चित्रीकरण जिल्ह्यातील भावेनगर, पिंपोडे, भाडळे, सातारा व आदर्की परिसरात करण्यात आले. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना व प्रसंगी स्वत:ची जमीन व गाडी विकून धोंडिबा कारंडे यांनी पैसा उभा केला. साताºयाच्या मातीतले हरहुन्नरी कलाकार आणि तंत्रज्ञांनी मोट बांधून त्यांनी सिनेमाचा श्रीगणेशा केला.
समस्त सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट अशी या सिनेमाची नुकतीच फ्रान्स येथे होणाºया कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी निवड झाली आहे. साताºयाच्या दृष्टीने ही गौरवशाली बाब आहे. कारण साताºयाच्या मातीत तयार झालेला अन् कान्स महोत्सवात झळकणारा साताºयातील हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पळशी गावातील ‘भागी’ नावाच्या पीटी उषाची गोष्ट सातासमुद्रापार पोहोचणार आहे.
या चित्रपटात संदीप जंगम यांनी छाया दिग्दर्शन आणि संकलन, निखिल गांधी यांनी डीआय, स्क्रीन प्ले म्हणून तेजपाल वाघ आणि महेश मुंजाळे, ध्वनी मयूर सकट, पार्श्वसंगीत विनित देशपांडे, मिश्रण निमिष
जोशी, वेशभूषा राजेंद्र्र संकपाळ यांच्यासह प्रशांत इंगवले, रोहिणी शेंडगे, राजभूषण सहस्त्रबुद्धे नीलिमा कमाने यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
‘पळशीची पीटी’ चित्रपटाची यापूर्वीही पुणे इंडिया फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे. तसेच या चित्रपटाला विविध तीन नामांकनेही मिळाली आहेत.
महाराष्ट्रातील तीन चित्रपटांचा समावेश
फ्रान्समध्ये ८ ते १८ मे या कालावधीत कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील तीन चित्रपटांची निवड केली जाते. यंदा इडक, क्षितीज आणि पळशीची पीटी या चित्रपटांची कान्ससाठी निवड झाली आहे.
पळशीची पीटी चित्रपटाची ‘कान्स’साठी निवड झाल्याचा आनंद आहे. मात्र, साताºयाच्या मातीसाठी आपण काहीतरी करू शकलो, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे श्रेय माझ्या एकट्याचे नसून सांघिक आहे.
- धोंडिबा कारंडे, दिग्दर्शक