फलक गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:40 AM2021-01-23T04:40:10+5:302021-01-23T04:40:10+5:30
फलक गायब (फोटो : २२इन्फोबॉक्स०२) कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याकडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सूचना तसेच दिशादर्शक फलक ...
फलक गायब (फोटो : २२इन्फोबॉक्स०२) कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याकडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सूचना तसेच दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. परंतु पाचवड फाटा ते उंडाळे दरम्यान लावण्यात आलेल्या फलकांची अज्ञातांकडून मोडतोड होत आहे. जागोजागी फलकांचे केवळ सांगाडे उभे असल्याचे दिसून येते. बांधकाम विभागाने नव्याने फलक लावणे गरजेचे आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
कऱ्हाड : येथील शाहू चौक व तहसील कार्यालय परिसरात दुचाकी व चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे लावण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. शाहू चौक नजीक असलेला तहसील कार्यालय परिसर कायम वर्दळीचा असल्याने येथे नागरिकांची व वाहनांची ये-जा होत असते.
उपमार्गावर अडथळा
कऱ्हाड : मलकापूरमध्ये सेवा रस्त्यावर मनमानीपणे मालट्रक तसेच दुरूस्तीस आलेली वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळेच सेवा रस्ता पार्किंग झोन बनल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उपमार्गावर वाहने पार्क करणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून केली जात आहे.
वन्यप्राण्यांकडून नुकसान (फोटो : २२इन्फोबॉक्स०१)
चाफळ : चाफळ विभागात पिकांची उगवण व वाढ चांगली झाली आहे. विभागात पडत असलेल्या थंडीमुळे पिकाला पोषक वातावरण तयार होऊन बळीराजा सुखावला असतानाच दुसरीकडे वन्यप्राणी पिकांची नासधूस करु लागल्याने चिंतेत सापडला आहे. वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.