पांगरी कोविड आयसोलेशन सेंटरला मदत करणार -जयकुमार गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:41 AM2021-05-07T04:41:01+5:302021-05-07T04:41:01+5:30
दहिवडी : ‘ग्रामस्थांनी पुढे येऊन आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. ही बाब अतिशय चांगली असून, या सेंटरला सर्वतोपरी ...
दहिवडी : ‘ग्रामस्थांनी पुढे येऊन आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. ही बाब अतिशय चांगली असून, या सेंटरला सर्वतोपरी मदत करणार आहे,’ असे प्रतिपादन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
पांगरी (ता. माण) येथील बिरोबा विद्यालयाच्या इमारतीमध्ये ग्रामपंचायत व गुरूकृपा ॲग्रो फूड्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या मातोश्री आयसोलेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, सोमनाथ भोसले, सरपंच दिलीप आवळे, माजी सरपंच डॉ. अजित दडस, मार्केट कमिटी सदस्य चंद्रकांत दडस, लक्ष्मण खरात, दिनकर दडस, बाळू दडस, रामभाऊ गोसावी, बापूराव दडस, बाळू दडस, शिवाजी दडस, विकास दडस, बाबा गायकवाड, विठ्ठल गायकवाड, मुरलीधर गायकवाड, सुखदेव गायकवाड, संतोष गायकवाड, तुकाराम दडस, राजेंद्र दडस आदी उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, ‘कोरोनासारखा आजार गंभीर असून हा नागरिकांनी अंगावर काढू नये, या आजाराची लक्षणे दिसताच या सेंटरमध्ये दाखल व्हा. आपणास लागणारी मदत पुरविण्यास तयार आहे. या गावातील ग्रामपंचायत व गुरुकृपा ॲग्रो फूड्स या संस्थेने पुढाकार घेऊन हे सेंटर सुरू केले आहे. त्यांचे कौतुक करणे आवश्यक आहे.’
बिरा लोखंडे यांनी आभार मानले.
कोट..
तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत दिवसातून दोन वेळा पेशंटची तपासणी करून मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. सध्या या सेंटरमध्ये एकूण १५ बेडची सुविधा करण्यात आली आहे. ज्या नागरिकांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. अशा नागरिकांनी कोविड सेंटरमध्ये विलगीकरणासाठी दाखल होऊन आपण व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
-डॉ. अजित दडस, माजी सरपंच
पांगरी (ता. माण) येथे आयसोलेशनचे उद्घाटन करताना आ. जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, डॉ. अजित दडस, सरपंच दिलीप आवळे उपस्थित होते. (छाया : नवनाथ जगदाळे)