शाहूनगरमध्ये बिबट्याची दहशत; वन विभागाने लावला पिंजरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:39 PM2018-10-21T23:39:47+5:302018-10-21T23:39:52+5:30
सातारा : शाहूनगरमधील मंगळाईदेवी मंदिर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे रविवारी वनविभागाच्या वतीने ...
सातारा : शाहूनगरमधील मंगळाईदेवी मंदिर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे रविवारी वनविभागाच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, अजिंक्यतारा किल्ला परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असते. गेल्या काही दिवसांपासूम बिबट्याने किल्ला परिसरातील मंगळाईदेवी मंदिरानजीक बिबट्याने तळ ठोकला आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्या किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या शाहूनगरमधील अजिंक्य कॉलनीमध्ये वावर वाढला होता. त्याने सलग दोन दिवस एका बंगल्यासमोर कुत्र्याच्या पिल्लांवर हल्ला चढवला. यात बिबट्याने दोन कुत्र्याची पिल्ले उचलून नेली. हा सर्व प्रकार बंगल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, रविवारी सकाळी वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रपाल शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर आवळे, सुहास भोसले, प्रशांत पडवळ, नीलेश राजपूत व कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. तसेच शाहूनगर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.