पांरपरिक नऊवारी होताहेत गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 09:59 PM2018-12-17T21:59:06+5:302018-12-17T22:01:04+5:30
भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. पेहराव तसेच रितीरिवाज जरी भिन्न असले तरी आपल्या संस्कृतीमध्ये अवघ्या महाराष्ट्राची ओळख असलेली मराठी पेहरावामध्ये डोक्यावर
खटाव : भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. पेहराव तसेच रितीरिवाज जरी भिन्न असले तरी आपल्या संस्कृतीमध्ये अवघ्या महाराष्ट्राची ओळख असलेली मराठी पेहरावामध्ये डोक्यावर फेटासोबत जोडीला नऊवारी साडी पूर्वी घराघरांमध्ये असायची; परंतु आता नऊवारी साडी परिधान करणाºया महिलांची संख्या कमी झाल्याने नऊवारी साडीची नजाकत केवळ समारंभापुरतीच मर्यादित राहिली आहे. आजकाल लग्न समारंभातील एखाद्या कार्यक्रमाचा विशेष पोषाख म्हणून नउवारीला पसंती आली आहे.
पूर्वी नऊवारी साडीतील स्त्री म्हणजे भारदस्त. स्त्री मराठमोळ्या नऊवारी साडीने कायम ठेवली होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून कालानरूप या पेहरावात बदल होत गेल्याने नऊवारी साडी नेसलेली स्त्रीच दुर्मीळ झाली आहे. ग्रामीण भागात क्वचित नऊवारी साडी परिधान केलेली स्त्री नजरेस पडते. नऊवारीच्या ऐवजी सहावारीच साडी स्त्रियांना परिधान करण्यास सहज व सोपी वाटत असल्याने त्यालाच अधिक मागणी वाढत आहे.
काळ बदलला तसे प्रत्येक प्रांताचा पोषाख केवळ समारंभासाठी मर्यादित राहिला आहे. घरोघरी नऊवारीत दिसणारी आई आजी सहावरीत दिसू लागली आहे. काळाबरोबरच आता सहावरीची जागा सलवार कुर्त्याने घेतली आहे. त्यामुळे बहुतांश स्त्रिया ज्यामध्ये लहानापासून ज्येष्ठापर्यंत सलवार कुर्त्याचा पेहराव आवडीने घालताना दिसून येतात. त्यामुळे नऊवारी साडी ही केवळ समारंभाची शोभा झाली आहे.
लग्न समारंभातील साखरपुडा, हळदी समारंभ लग्न समारंभ आदीमध्ये नऊवारीला मानाचे स्थान आले आहे. नववधूकडून यापैकी एका विधीसाठी का होईना, हा अस्सल मराठमोळा पोषाख करण्याचा आग्रह केला जातो.
पैठणी, पेशवाई साड्यांना अधिक मागणी
विविध समारंभासाठी नऊवारीला वाढती मागणी असल्याने त्यामध्ये पैठणी, पेशवाई आदींना अधिक मागणी होत आहे. नऊवारी साडी कशी परिधान करतात, याचे तंत्र माहीत नसल्याने यावर अत्यंत सुंदर शक्कल लढवली गेली आहे. नऊवारी साडी आता तयार शिऊन मिळू लागल्याने आता कासोटा, साडीपासून ब्राह्मणी, कोल्हापुरी तसेच लावणीसाठी लागणारी नऊवारी साडी शिऊन तयार मिळत असल्याने महिलांचा व तरुणींचा ओढा या साडीकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. तरुणींमध्ये तर या साडीचे अधिक आक र्षण पाहावयास मिळते. घरगुती समारंभाबरोबरच कॉलेजमध्ये होणाºया पारंपरिक दिन, स्रेह संमेलन आदी समारंभात जास्त प्राधान्य नऊवारी साडीला देताना पाहावयास मिळते.