पालक ऊसतोडीला जाताच मुले दौंडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:14 PM2019-02-03T23:14:32+5:302019-02-03T23:14:37+5:30
कºहाड : ऊसतोड मजुरांची तीन अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता झाली. त्यांच्या आर्इंनी आक्रोश केला. बापानी पोलीस स्टेशन गाठलं. अपहरणाचा ...
कºहाड : ऊसतोड मजुरांची तीन अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता झाली. त्यांच्या आर्इंनी आक्रोश केला. बापानी पोलीस स्टेशन गाठलं. अपहरणाचा गुन्हाही दाखल केला. आणि पोलिसांच्या तपासात ती तीन्ही मुलं त्यांच्याच एका नातेवाईकांकडे दौंडमध्ये आढळली. कºहाड शहर पोलिसांनी तातडीने तपास केल्यामुळे मुलांचा शोध लागला. आणि पालकांचा जिव भांड्यात पडला.
जालना जिल्ह्णातील मानेपुरी गावातील काही ऊसतोड मजूर कºहाड तालुक्यातील केसे गावात मजुरीसाठी आले आहेत. गावातील नविन गावठाणात भैरवनाथ मंदिराजवळ झोपड्यांमध्ये या कुटूंबांचे वास्तव्य आहे. संबंधित कुटूंबांतील पुरूष आणि महिला दररोज सकाळी ऊसतोडीसाठी जातात. रात्री उशिरा ते झोपडीकडे परत येतात. दिवसभर झोपडीत त्यांची मुलेच असतात. अशातच २९ जानेवारी कुटूंबातील दशरथ रोहिदास पवार (वय १४), बारीक अशोक ठाकरे (८) व गोरख बबन बर्डे (१६) ही मुले अचानक बेपत्ता झाली. संबंधित मुलांच्या आर्इंनी आक्रोश सुरू केला. मजुरांसह आसपासच्या ग्रामस्थांनी गावात तसेच आसपासच्या परिसरात मुलांचा शोध घेतला. काही नातेवाईकांनाही फोनवरून संपर्क केला. मात्र, मुले सापडली नाहीत. ३१ जानेवारी रोजी रोहिदास अंबादास पवार (वय ४०) यांनी कºहाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
पोलीस उपनिरीक्षक भारत चंदनशिव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. बेपत्ता असलेल्या मुलांपैकी गोरख बर्डे या मुलाकडे मोबाईल होता. मात्र, तो बंद लागत होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता मुले दौंडमध्ये असल्याचे समोर आले. पोलीस पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी गोरख बर्डे या मुलाचा भाऊ दौंडमध्ये राहत असल्याचे व संबंधित तीन्ही मुले त्याच्याकडे गेली असल्याचे समोर आले. तिघांना ताब्यात घेऊन कºहाड शहर पोलीस ठाण्यात आणले. रविवारी सकाळी संबंधित मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
साठवलेल्या पैशातून केला प्रवास
दशरथ, बारीक आणि गोरख या तिन्ही मुलांकडे साठवलेले थोडे थोडे पैसे होते. तसेच गोरखकडे मोबाईल होता. साठवलेले पैसे या तिघांनी एकत्र करून दौंडला जायचा बेत आखला. घरात सांगीतलं तर जाऊ देणार नाहीत, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे घरात कोणाला काहीही न सांगता ते एसटीने दांैडला गेल्याचे तपासातून समोर आल्याचे उपनिरीक्षक भारत चंदनशिव यांनी सांगीतले.