परळीचे ग्रामसचिवालय सर्वोत्तम

By admin | Published: June 14, 2015 11:51 PM2015-06-14T23:51:38+5:302015-06-14T23:56:15+5:30

शिवेंद्रसिंहराजे भोसले : विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी गौरवोद्गार

Parli's Gramavichalaya is the best | परळीचे ग्रामसचिवालय सर्वोत्तम

परळीचे ग्रामसचिवालय सर्वोत्तम

Next

परळी : ‘सातारा तालुक्यातील सर्वोत्तम ग्रामसचिवालय हे परळीचे आहे. परळी गावच्या ग्रामसचिवालयाप्रमाणे इतर गावातील ग्रामस्थांनी अशाच प्रकारच्या इमारती उभ्या कराव्यात. आगामी काळात राज्य शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाकडून शंभर टक्के निधी प्रत्यक्ष ग्रामपंचायतींनाच मिळणार आहे. या निधीचा उपयोग करून गावाचा पूर्ण विकास करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
परळी येथील ग्रामसचिवालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण, कृष्णा खोरेचे व उरमोडी धरणाचे अभियंता दाभाडकर, महाराष्ट्र राज्य महामंडळाचे विभाग नियंत्रक धनाजीराव थोरात, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, सरपंच सतीश बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले व मान्यवरांच्या उपस्थितीत सज्जनगड फाटा ते भातखळे या ८०० मीटर रस्त्याचे उद्घाटन, बौद्धवस्ती पाणीपुरवठा योजना उद्घाटन, मागासवर्गीय जीम साहित्य लोकार्पण सोहळा, रवळीनाथ मंदीर रस्ता उद्घाटन, अंगणवाडी इमारत उद्घाटन, गावातील सर्व अंतर्गत रस्त्यांची उद्घाटने, परळी गावातील व्यायाम साहित्याचा लोकार्पण सोहळा, उरमोडी नदीवरील साकव पुलाचे भूमीपूजन, घंटागाडी लोकार्पण सोहळा, ग्रामपंचायत व्यापारी संकुलातील गाळ्यांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे परळी ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच परळीचे ग्रामसेवक के. एस. मोहिते यांची बदली झाल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Parli's Gramavichalaya is the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.