जागतिक आर्चरी स्पर्धेत पार्थ साळुंखेला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:04+5:302021-08-18T04:46:04+5:30
सातारा : करंजे पेठेतील शिक्षण प्रसारक संस्थेचा खेळाडू पार्थ साळुंखे याने पोलंडमध्ये झालेल्या युवा जागतिक आर्चरी स्पर्धेत भारतीय संघामधून ...
सातारा : करंजे पेठेतील शिक्षण प्रसारक संस्थेचा खेळाडू पार्थ साळुंखे याने पोलंडमध्ये झालेल्या युवा जागतिक आर्चरी स्पर्धेत भारतीय संघामधून पुरुष गटात आणि मिश्र गटात सुवर्णपदक मिळविले.
पार्थ साळुंखे हा शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी असून संस्थेने विकसित केलेल्या आर्चरी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असतो. त्याचे प्रशिक्षक श्रीपतराव पाटील हायस्कूलचे शिक्षक सुशांत साळुंखे हे त्याला मार्गदर्शन करतात. संस्थेने सचिव तुषार पाटील यांच्या प्रयत्नातून हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध शाखांतून शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.
पार्थ साळुंखे आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांनी मिळविलेल्या युवा जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकाबद्दल विविध स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, स्कूल समिती चेअरमन वत्सलाताई डुबल, संचालिका हेमकांची यादव, प्रतिभा चव्हाण, संचालक धनंजय जगताप, अॅड. भीमराव फडतरे, पदाधिकारी आणि संचालक, कर्मचाऱ्यांनी सुशांतला अमेरिकेत होणाऱ्या सीनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप आर्चरी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
.............