उरमोडीच्या पाण्यासाठी म्हसवडमध्ये मोर्चा-शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:41 PM2018-06-19T23:41:00+5:302018-06-19T23:41:00+5:30

माण तालुक्याच्या पूर्व भागातील म्हसवडसह आजूबाजूच्या अनेक गावांसाठी उरमोडी धरणाचे पाणी माण नदीत सोडण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हसवड कडकडीत बंद पाळला. यावेळी शेकडो

Participants in front-of-hundreds farmer agitation in Mhaswad for Urmodi water | उरमोडीच्या पाण्यासाठी म्हसवडमध्ये मोर्चा-शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी

उरमोडीच्या पाण्यासाठी म्हसवडमध्ये मोर्चा-शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी

Next
ठळक मुद्दे कडकडीत बंद

म्हसवड : माण तालुक्याच्या पूर्व भागातील म्हसवडसह आजूबाजूच्या अनेक गावांसाठी उरमोडी धरणाचे पाणी माण नदीत सोडण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हसवड कडकडीत बंद पाळला. यावेळी शेकडो शेतकºयांनी मोर्चा काढून बसस्थानक चौकात काहीकाळ रास्ता रोको केला.

राज्य सरकारने माण तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा काहीअंशी प्रश्न सुटण्यासाठी उरमोडीचे पाणी सोडले. तालुक्यातील काही भागांत हे पाणी आले; पण पूर्व भागात आलेले नाही. त्यामुळे येथील शेतकरी अनेक दिवसांपासून उरमोडीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत होते.

पाण्यासाठी अनेकवेळा अधिकाºयाकडे हेलपाटे मारूनही काही उपयोग झाला नाही. म्हसवडपासून सहा किलोमीटरपर्यंत पाणी येते; पण आपल्याला मिळत नाही, हे ओळखून या परिसरातील शेतकºयांनी एकत्रित येत माजी नगराध्यक्ष विलास माने, माजी नगरसेवक कैलास भोरे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धनाथ मंदिरापासून मोर्चा काढला. बसस्थानक चौकात सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

‘म्हसवड परिसरात उरमोडीचे पाणी सोडण्यास काही राजकीय मंडळींचा विरोध असल्याने त्यांनी अधिकाºयांना सोबत घेऊन या भागाला उरमोडीचे पाणी जाणीवपूर्वक मिळू द्यायचे नाही, असा घाट घातला आहे,’ असा आरोप अनेक आंदोलनकर्त्यांनी केला. पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांच्या कार्यपद्धतीचा तीव्र शब्दात निषेध केला.
यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या शेतकºयांच्या प्रश्नासाठी म्हसवड शहरातील व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवून शेतकरी बांधवांच्या लढ्याला पाठिंबा दिला. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली होती. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसवड पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सातारा-पंढरपूर मार्गावर रास्ता रोको
उरमोडीच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी सकाळपासूनच म्हसवडमध्ये दाखल होत होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचं’, ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही,’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सातारा-पंढरपूर मार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको करण्यात आला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: Participants in front-of-hundreds farmer agitation in Mhaswad for Urmodi water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.