पक्षांनी केली कोंडी; नाही तर मांडीला मांडी

By Admin | Published: October 2, 2014 09:47 PM2014-10-02T21:47:24+5:302014-10-02T22:23:18+5:30

पाटण : स्वतंत्र लढाईमुळे अनेकांची गोची, इच्छा नसताना उमेदवारी

Parties have stopped; If not, then you have a knuckle thigh | पक्षांनी केली कोंडी; नाही तर मांडीला मांडी

पक्षांनी केली कोंडी; नाही तर मांडीला मांडी

googlenewsNext

अरुण पवार - सातारा -पाटणमध्ये आमदार विक्रमसिंह पाटणकर व शंभूराज देसाई या प्रमुख नेत्यांनी आजवर मिळविलेली आमदारकी इतर पक्ष, व्यक्ती व संघटनांनी हातभार लावल्यामुळे मिळविली, हे निकालाच्या आकडेवारीवरून जाणवते. मग त्यासाठी अशा मंडळांची मनधरणी करताना साम, दाम, दंड, भेद मार्गाचा अवलंब झाला नसेल तर ती निवडणूक कसली. या खेपेस मात्र स्वतंत्र लढायचा निर्णय सर्वच पक्षांनी घेतल्यामुळे परंपरेप्रमाणे दोन्ही नेत्यांच्या छावणीत जाऊन मांडीला मांडी लावायचा बेत फसला. इच्छा नसताना अनेकांना उमेदवारी करावी लागत आहे. त्यातच पंचवार्षिक मिळणारी पुंजी हातातून गेली, अशी गत झाली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पाटणमध्ये सत्यजित पाटणकर (राष्ट्रवादी), शंभूराज देसाई (शिवसेना), हिंदुराव पाटील (काँग्रेस), रवींद्र शेलार (मनसे), दीपक महाडिक (भाजप) अशा प्रमुख उमेदवारांची लढती होणार आहेत. काँग्रेसमधून हिंदुराव पाटलांचा एकमेव अर्ज उरला आहे. नरेश देसाई यांचा काँग्रेसमधून भरलेला अर्ज बाद झाला. तर भाजपचे प्रकाश पाटील यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे आता वरील उमेदवारांसह इतर छोटे पक्ष व अपक्षांची बहुरंगी लढत प्रथमच पाहावयास मिळणार आहे. यापूर्वी झालेल्या पाटण विधानसभा निवडणुकीत देसाई-पाटणकर आणि इतर एक-दोन अपक्ष उमेदवार अशी लढत झाली. मग बाकीचे पक्ष व त्यांचे नेते, कार्यकर्ते काय करायचे? हे पाटणची जनता जाणून आहे.
देसाई-पाटणकरांच्या झुंजीत आपली डाळ शिजणार नाही. मग वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे, असाच पवित्रा काही जणांंचा असायचा. मात्र, त्यांच्या पाठिंब्यावरच देसाई-पाटणकरांचा जय-पराजय ठरायचा. यावेळेस मात्र सगळ्याच पक्षांचा सवतासुभा असल्यामुळे आतल्या हाताने काम करायची संधी हुकली आणि नेमकी उमेदवारीच गळ्यात पडली, अशी काहीची अवस्था झाली आहे. त्यामुळे आता देसाई-पाटणकर गटांची भिस्त नेते व कार्यकर्ते यांच्यावरच अवलंबून राहणार आहे.

काँग्रेसचे उमेदवार हिंदुराव पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या पत्नी मंदाकिनी पाटील सध्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. त्यांचा ढेबेवाडी विभागात वरचष्मा आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अनेकवेळा किंगमेकरची भूमिका दाखवून दिली आहे. मनसेने उमेदवार बदलून रवींद्र शेलार यांना दिली. गतवेळेस अविनाश पाटील (बनपुरी) यांना मनसेने उमेदवारी दिली होती. त्यांनी दोन हजार मते मिळविली. पाटील देसाई कारखान्याचे व्हा. चेअरमन होते. सागर माने हे जि.प.चे माजी कृषी सभापती बाळासाहेब माने यांचे पूत्र आहेत. यांच्यासह इतरांना टक्कर देत सत्यजित आणि शंभूराज यांना कितपत लक्ष्य गाठता येते, हे पाहावे लागणार आहे.

Web Title: Parties have stopped; If not, then you have a knuckle thigh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.