प्रवाशांना डेमू रेल्वेसोबत मासिक पासची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:41 AM2021-09-26T04:41:41+5:302021-09-26T04:41:41+5:30
सातारा : सातारकरांचे पुणे, मुंबई त्याचप्रमाणे कोल्हापूरला दररोज विविध कामानिमित्ताने दररोज जाणे होते. दिवसभर काम करून अनेक जण सायंकाळी ...
सातारा : सातारकरांचे पुणे, मुंबई त्याचप्रमाणे कोल्हापूरला दररोज विविध कामानिमित्ताने दररोज जाणे होते. दिवसभर काम करून अनेक जण सायंकाळी परत साताऱ्याला येतात. मात्र, सकाळी पुण्याकडे जाणे व परत पुण्याहून येण्यासाठी सायंकाळी सोयीची गाडीच नाही. त्यामुळे रेल्वेचा एका दिवसाच्या प्रवासासाठी उपयोगच होत नाही. त्यामुळे पॅसेंजर (डेमू) आणि मासिक पास सुरू होण्याची प्रवासी वाट पाहत आहेत.
चौकट :
सध्या रोज सुरू असलेल्या गाड्या
निजामुद्दीन-गोवा
महाराष्ट्र एक्स्प्रेस
महालक्ष्मी एक्स्प्रेस
कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल ट्रेन
चौकट
मुंबईत लोकल राज्यात का नाही?
मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे जणू जीवनवाहिनीच आहे. ती अखेर रेल्वे मंत्रालयाने सुरू केली आहे. रेल्वेमधूनही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यासाठी कोरोनाचे लसीकरण दोन्ही केलेले असणे आवश्यक केले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर भागांसाठी रेल्वेने पॅसेंजर गाड्या सुरू करणे गरजेचे आहे. याचे दरही कमी असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवास करणे परवडणारे असते, तसेच ती दोन्ही वेळेला धावत असल्याने दिवसभर काम करून रात्री आपापल्या गावी परत जाता येते.
चौकट
भुर्दंड किती दिवस सहन करायचा
साताऱ्यातून पुण्याला जाण्यासाठी पॅसेंजरला जेवढा खर्च येतो. त्यापेक्षा जास्त पैसे सातारकरांना राजवाड्यापासून रेल्वे स्टेशनला रिक्षाने जाण्यासाठी येतो. त्यानंतर एक्स्प्रेसचे दर परवडत नाही.
- राजेंद्र जाधव, सातारा
साताऱ्यातून अनेक शेतकरी कृषी साहित्य खरेदीसाठी पुण्याला जातात. दिवसभर खरेदी करून रात्री पॅसेंजरने परत गावी जात होते. आता पॅसेंजर नसल्याने एसटीने जादा पैसे मोजून जावे लागते. हे किती दिवस चालणार आहे.
- रमेश शहापुरे, सातारा
पुण्याला जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील दुय्यम स्थानकात दुपारी बारा वाजेपर्यंत गाडीच नाही. त्यानंतर पुण्याला जायचे म्हणजे पोहोचायला उशीर होतो. खरेदी करून परत जाऊ शकत नाही.
- सूर्यकांत ढावरे, सातारा