जिल्ह्यातील प्रवासी मोबाईलवरच पाहणार कुठपर्यंत आली एस. टी.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:42 AM2021-08-24T04:42:25+5:302021-08-24T04:42:25+5:30

सातारा : राज्य परिवहन महामंडळाने नेहमीच वेगवेगळ्या सुविधा प्रवाशांना देण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे गाड्यांना ट्रॅकिंग यंत्रणा असते. त्यामुळे ...

Passengers in the district will be able to see only on mobile. T.! | जिल्ह्यातील प्रवासी मोबाईलवरच पाहणार कुठपर्यंत आली एस. टी.!

जिल्ह्यातील प्रवासी मोबाईलवरच पाहणार कुठपर्यंत आली एस. टी.!

googlenewsNext

सातारा : राज्य परिवहन महामंडळाने नेहमीच वेगवेगळ्या सुविधा प्रवाशांना देण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे गाड्यांना ट्रॅकिंग यंत्रणा असते. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या रेल्वे कुठपर्यंत आली हे कळते. त्याच धर्तीवर एस. टी.नेही १५ ऑगस्टपासून ट्रॅकिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामध्ये गाडीची इत्यंभूत माहिती भरली जाते. त्यामुळे आपल्याला आवश्यक असलेली एस. टी. कुठपर्यंत आली आहे, हे प्रवाशांना मोबाईलवरुनही पाहता येणार आहे.

सातारा विभागात यापूर्वी ट्रॅकिंग सिस्टीम बसविलेल्या होत्या. त्यामुळे महामंडळातील प्रत्येक आगारात असलेल्या टीव्ही स्क्रीनवर गाडीची माहिती मिळत होती. ती आता प्रवाशांना मोबाईलवरही पाहता येणार आहे. त्यामुळे त्यानुसार प्रवासी त्यांच्या कामाचे नियोजन करू शकतात.

चौकट

बस कोठे आली आहे, हे आधीच कळणार

कोणतीही एस. टी. आगारातून बाहेर जाताच एस. टी.चा नंबर, चालकाचे नाव यंत्रणेवर फिट केले जाते. त्यामुळे एस. टी. प्रवासाला लागल्यानंतर जीपीएसमुळे गाडी कुठेपर्यंत आली आहे, हे प्रवाशांना मोबाईल ॲपमुळे कळू शकणार आहे. यासाठी गाडीचा नंबर माहीत असल्यास हे काम आणखी सोपे होणार आहे.

चौकट

१५ ऑगस्टचा मुहूर्त साधला

विविध कामानिमित्ताने आपण शहरात जातो. दिवसभरात अनेक कामे होत नाहीत. मात्र एसटी चुकेल म्हणून अनेकदा कामे बाजूला ठेवून बसस्थानक गाठावे लागते.

एवढे करुनही एस. टी.ला उशीर होणार असेल तर चिडचिड होते. वेळ वाया जातो आणि कामही करता येत नाही. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

अखेर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी एस. टी.ने १५ ऑगस्टचा मुहूर्त साधला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांच्या वेळेची व पैशाची बचत होण्यास मदत होणार आहे.

कोट

सातारा आगारातील सर्वच गाड्यांना ही सुविधा बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवासी मोबाईलवरुन या यंत्रणेचा वापर करुन अपेक्षित असलेली एस. टी. कुठपर्यंत आली आहे, हे समजू शकणार आहे.

- रेश्मा गाडेकर

आगार व्यवस्थापक, सातारा.

चौकट

साडेसातशे गाड्यांमध्ये यंत्रणा कार्यान्वित

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात साडेसातशे गाड्या आहेत. त्यातील सर्वच गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. ती आजवर एस. टी.च्या अधिकाऱ्यांसाठी वापरता येत होती. मात्र यापुढे सर्वसामान्य प्रवाशांनाही ॲपवरुन वापरता येणार आहे.

चौकट

Web Title: Passengers in the district will be able to see only on mobile. T.!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.