राखी पाैर्णिमेला रेल्वेकडे प्रवाशांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:52+5:302021-08-22T04:41:52+5:30
सातारा : रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. साहजिकच या सणासाठी बहीण-भाऊ एकमेकांच्या गावी जातात. त्यामुळे एसटीने जादा ...
सातारा : रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. साहजिकच या सणासाठी बहीण-भाऊ एकमेकांच्या गावी जातात. त्यामुळे एसटीने जादा गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे आरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेकडे पाठ फिरवली असल्याचेच जाणवत आहे.
सातारा जिल्ह्यातून दळणवळणाची चांगलीच प्रगती झाली आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग, सातारा-सोलापूर राज्य मार्ग गेलेले असल्याने वाहनांनी जाण्याचे प्रमाण जास्त आहे. एसटीने फेऱ्याही वाढविल्याने सातारकरांकडून एसटीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे रेल्वेचे पुढील दिवस आरक्षण सहज मिळत आहे.
चौकट
गाड्यांना उपलब्ध आरक्षण
कोल्हापूर-सीएसएमटी स्पेशल - १३
कोल्हापूर-सीएसएमटी स्पेशल - १८
हे आरक्षण लोणंद रेल्वे स्थानकातून उपलब्ध आहे.
चौकट
nसातारा जिल्ह्यातून कोरोनापूर्वी रेल्वेचा वापर होत होता. तो कोरोनानंतर पूर्णपणे थांबला होता. अजूनही प्रवास करण्यासाठी आगाऊ आरक्षण करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे पन्नास टक्के प्रवासी संख्या वाढली आहे.
nरेल्वेने पॅसेंजर गाडी सुरू केल्यानंतर ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. त्यानंतर मात्र पूर्ण क्षमतेने वाहतूक वाढणार आहे.