४७ हजार सातारकरांकडे पासपोर्ट : परदेशात जाण्यासाठी युवक आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:50 PM2019-05-30T22:50:14+5:302019-05-30T22:59:00+5:30
दत्ता यादव। सातारा : जगभरातील विविध देशांमध्ये सातारकरांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी आयटी क्षेत्रात करिअर करायचं असेल ...
दत्ता यादव।
सातारा : जगभरातील विविध देशांमध्ये सातारकरांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी आयटी क्षेत्रात करिअर करायचं असेल तर परदेशात जायचं, असं युवकांचं ठरलेलं होतं; पण काळ बदलत गेला तसं असंख्य सातारकर हवापालट करण्यासाठी म्हणूनही परदेशवारी करू लागले आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत तब्बल ४७ हजार ८०७ सातारकरांनी पासपोर्ट काढले असून, यामध्ये शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे.
पूर्वी परदेशातून एखादी व्यक्ती आपल्या गावात आली की, अनेकांना फार नवल वाटायचं. त्यांच्याकडून परदेशातील रितीरिवाज, तेथील कायदे, आपल्या देशातील आणि त्यांच्या देशातील फरक, याची माहिती घेतली जायची. एवढेच नव्हे तर परदेशातून आलेल्या व्यक्तीला समाजामध्येही चांगले स्थान दिले जायचे. एकंदरीत त्या व्यक्तीबद्दल कुतूहल असायचे. मात्र, आता अशी परिस्थिती राहिली नाही. परदेश गमनासाठी आता अख्खी कुटुंबेही जाऊ लागली आहेत.
पूर्वी एखादी व्यक्ती परदेशात जायची. परंतु आता आपल्या शेजारी पाजारी अनेकजण परदेशात जाऊन फिरून आले आहेत. त्यामुळे परदेशात जाणे आता सोपे झाले आहे, हे पाहायला मिळत आहे. परंतु परदेशात जाण्यासाठी लागणारा पैसा महत्त्वाचा असतो. तो पैसा मिळवणारी लोक स्थिरस्थावर झाली असल्यामुळे लोकांच्या हातात पैसा आला. त्यामुळेच परदेशवारीचे स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
आयटी क्षेत्रात नोकरी करणाºया युवकांना पासपोर्ट सक्तीचे केल्यामुळे वर्षाकाठी ही संख्या आणखीनच वाढत आहे. त्याचबरोबर व्यापारी, डॉक्टर या वर्गातील लोकांच्याही परदेश वाºया होऊ लागल्या असून, सातारा जिल्ह्यातील बागायतदार शेतकºयांमधूनही पासपोर्ट काढण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. पूर्वी काहीजण केवळ नोकरीनिमित्त पासपोर्ट काढत होते; परंतु आता लगेच परदेशात जाता आले नाही तरी भविष्यात कधी प्लॅनिंग होईल, त्यावेळी जाऊ, असे ठरवून अनेकजण कुटुंबातील सर्वच व्यक्तींचा पासपोर्ट काढून ठेवत असल्याचे व्हेरीफिकेशन करणाºया अधिकाºयांनी सांगितले. अलीकडे पासपोर्ट काढणाºयांची संख्या वाढत असून, गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल ४७ हजार ८०७ सातारकरांनी पासपोर्ट काढून परदेश गमनाचा मार्ग खुला केला आहे.
आख्खं कुटुंब काढतंय पासपोर्ट..
कºहाड, सातारा, फलटण आणि वाई हे चार तालुके पासपोर्ट काढण्यासाठी आघाडीवर आहेत.
महिन्याकाठी तीन ते चार हजार व्यक्तींचे पासपोर्टसाठी अर्ज येतात.
संपूर्ण कुटुंब पासपोर्टसाठी आग्रही
पडताळणीनंतर एका महिन्यात मिळतोय पासपोर्ट.
व्हेरीफिकेशन झाल्यानंतर आम्ही पासपोर्टची सर्व कागदपत्रे पुणे कार्यालयात पाठवितो. त्यानंतर तीस दिवसांच्या आत संंबंधित व्यक्तीला पासपोर्ट मिळते. पासपोर्टसाठी अर्ज अलीकडच्या काळात वाढले आहे.
- ज्योतिराम गुंजवटे पोलीस निरीक्षक