अतीत यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:07+5:302021-03-05T04:39:07+5:30
शीतपेयांची मागणी वाढली सातारा : थंडीचा कडाका संपल्यानंतर जिल्ह्यात कधी ढगाळ वातावरण, तर कधी अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा ...
शीतपेयांची मागणी वाढली
सातारा : थंडीचा कडाका संपल्यानंतर जिल्ह्यात कधी ढगाळ वातावरण, तर कधी अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा, अशा संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. आता तर मार्च महिना सुरू झाला आणि तापमानही वाढू लागले आहे.
ग्राहकराजा उदासीन
सातारा : ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे नाते तसे व्यावहारिकच; परंतु जसा व्यापारी पैसे मोजून घेतो, तसे ग्राहक माल पारखून घेतोच, असे नाही. माल खराब लागल्यानंतर मात्र अनेकदा ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतो.
पथदिव्यांची मागणी
सातारा : सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने त्रिशंकू भागातील गोडोली, साईमंदिर झोपडपट्टी, मोरे कॉलनी, यशवंत कॉलनी, बाॅम्बे रेस्टॉरंट ते अजंठा चौक परिसर, ठक्कर सिटी, आदी बागांसह त्रिशंकू भाग हा पालिकेच्या अखत्यारीत आला आहे.
रक्तदान शिबिर
सातारा : अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वर्ये सातारा येथे व बालाजी ब्लड बँक, सातारा यांच्याद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य डॉ. विलास फरांदे यांनी केले.
राष्ट्रीय लोकअदालत
सातारा : सातारा जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने १० एप्रिलला सकाळी १० वाजता येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव यांनी दिली. या लोकअदालतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदी रखडल्या
सातारा : महसूलचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सातबारा उतारे तसेच फेरफाराच्या नोंदीच होऊ शकलेल्या नाहीत. परिणामी सोसायटींच्या कर्ज इ-करारच्या नोंदी न होऊ शकल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वाहने सुसाट
सातारा : वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोवई नाका येथे उभारलेल्या ग्रेेड सेपरेटरची नवलाई संपल्याचे दिसून येत आहे. ग्रेड सेपरेटरचा वापर टाळण्यासाठी सातारा तसेच परिसरातील चालकांनी भर दिल्याने गर्दीच्या वेळी भुयारी मार्ग वाहनाविना ओस पडत आहे.
उलाढाल मंदावली
सातारा : चार-पाच दिवसांपासून ग्रामीण बागातील यात्रा-जत्रांना सुरुवात झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ धार्मिक विधी करण्याची परवानगी असल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
वृद्धाश्रमात धान्यवाटप
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे श्रीसंत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने कुरवली येथील वृद्धाश्रमात धान्यवाटप तसेच आर्थिक मदत करण्यात आली. तसेच यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळेतील मुलांना मास्कचे वाटप केले.
कुस्तीत कांस्यपदक
नागठाणे : अंबवडे खुर्द भोंदवडे (ता. सातारा) येथील विद्यार्थी शिवराज माने याने जिल्हास्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत २५ किलो वजनीगटात कास्यपदक पटकावले. त्याला जे. के. कणसे यांच्यासह मृणालिनी खटावकर, उल्फत पटेल, रोहिणी कुंभार, संगीता घनवट, वृषाली मानकर, संदेश चावरे यांनी मार्गदर्शन केले.
शूटिंगमध्ये रौप्यपदक
सातारा : वरळी (मुंबई) येथे झालेल्या कॅप्टन इझेकल राज्यस्तरीय पॉईंट टू-टू पिस्टल शूटिंग स्पर्धेत मुलींच्या ज्युनिअर विभागात येथील प्रांजली प्रशांत धुमाळ हिने दुसरा क्रमांक मिळविला. त्यामुळे रौप्यपदक देऊन तिचा गौरव करण्यात आला.