पाटण पंचायत समितीत नेत्यांचीच पंचायत !

By admin | Published: November 29, 2015 11:41 PM2015-11-29T23:41:30+5:302015-11-30T01:17:04+5:30

वर्षाचा कालावधी शिल्लक : देसाई-पाटणकर गटांतील सदस्यांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण, वेळ वाया घालविण्याचे काम; जनतेच्या प्रतिक्रिया

Patan panchayat committee leaders of Panchayat! | पाटण पंचायत समितीत नेत्यांचीच पंचायत !

पाटण पंचायत समितीत नेत्यांचीच पंचायत !

Next

पाटण : आपापल्या विभागातील गावांचा व तेथील जनतेचा विकास करण्यासाठी निवडून आलेल्या पाटण पंचायत समितीतील सदस्यांचा केवळ एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. गेल्या चार वर्षांतील सदस्यांची कामगिरी पाहता केवळ एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण करण्याचे डावपेच आखण्यातच वेळ वाया घालविण्याचे काम केल्याच्या जनतेतून प्रतिक्रिया उमटत
आहेत. नुकत्याच झालेल्या पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत काही सदस्यांनी कमालीचा गोंधळ घालून आपापल्या नेत्यांचीच पंचायत केल्यामुळे झालेल्या वादाची चर्चा जिल्हाभर गाजत आहे. पाटण तालुक्यात नेहमीच राजकारणाचा संघर्ष का पेटलेला असतो, याचे कारण शोधायचे झाल्यास विद्यमान आमदार शंभूराज देसाई व माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर या नेत्यांचे प्रबळ दोन गट. पाटण पंचायत समितीत देखील आठ-आठ असे संख्याबळ आहे. त्यामुळे विकासाच्या नावानं चांगभलं, आधी फक्त एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्यातच जास्त रस असल्याचे मागील चार वर्षांच्या घटनांवरून दिसते.
माजी सभापती वनिता कारंडे यांच्या काळात त्यांचे पती व बडेकर नावाच्या बांधकाम अधिकारी यांच्यातील वाद. त्यानंतर १५ आॅगस्ट रोजी पाटणकर गटाने सभापती कारंडे यांना घातलेला घेराव आणि सदस्या सुमन जाधव या बोगस जात प्रमाणपत्रावर सभापती बनू पाहतात. याचा शोध पाटणकर गटाच्या पंचायत समिती सदस्यांनीच लावला.त्यानंतर राजाभाऊ शेलार यांनी कोयनानगर येथे आयोजित केलेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेवर देसाई गटाच्या सर्व सदस्यांचा बहिष्कार यावरून निर्माण झालेले वादळ आणि आता आमदार शंभूराज देसार्इंचा निषेध करण्याचा पाटणकर गटाच्या सदस्यांचा प्लॅन या सर्व घटनांमुळे पाटण तालुक्यात म्हणा किंवा पंचायत समितीत केवळ, राजकीय अडवाअडवी सुरू असल्याचा मेसेज आता बाहेर आला आहे. दरम्यान, गुरुवारच्या पंचायत समितीच्या मासिक सभेतील आकांडतांडवामुळे तर न्यायालयाला त्रास झाला. (प्रतिनिधी)

सभागृहात फिफ्टी-फिफ्टी संख्याबळ...
पाटणचे दोन्ही नेते आपापल्या पातळीवर एकमेकांवर टीका करतात हे ठिक. मात्र त्यांचा कड ओढून समर्थक सदस्यसुद्धा थेट नेत्यांवर भर सभेत बोलतात. मग फिफ्टी-फिफ्टी संख्याबळ असलेल्या सभागृहात भडका न उडेल तर नवलच.


निषेधाची पूर्वतयारी होती...
आमदार शंभूराज देसाई यांच्या निषेधाची पूर्वतयारी केल्याचा आरोप रामभाऊ लाहोटी यांनी केला. १९९२ पासून मी पंचायत समिती सभागृहात आहे. मात्र अशा प्रकारचा अतिरेक कधी झाला नव्हता. नेत्यांमुळेच आपण सदस्य झालो याचे भान ठेवून कोणी कुणावर बोलावे, याची पातळी समजली पाहिजे. दोन्ही नेत्यांच्यात चकमक होते, तो भाग वेगळा आहे आणि आमदार शंभूराज देसाई यांनी काम रद्द केले नाही तर त्या कामाचा निधी इतर विकासकामांसाठी वळविलेला आहे.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी मंजूर केलेला ३८ लाखांचा निधी इतरत्र वळविण्याचा अधिकार विद्यमान आमदारांना नाही. सत्ता आली म्हणून असे करणे योग्य नाही. भूकंपबाधित बचत भवनची नवीन इमारत होणे गरजेचे आहे.
- राजाभाऊ शेलार

Web Title: Patan panchayat committee leaders of Panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.