पाटण पोलिसांना मिळणार हक्काची घरे

By admin | Published: February 11, 2016 10:00 PM2016-02-11T22:00:43+5:302016-02-11T23:57:38+5:30

प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे : राज्य शासनाकडून ३ कोटींचा निधी मंजूर

Patan police will get rightful houses | पाटण पोलिसांना मिळणार हक्काची घरे

पाटण पोलिसांना मिळणार हक्काची घरे

Next

मल्हारपेठ : राज्यातील पोलिसांना राहण्यासाठी शासनाकडून पोलिसांच्या निवासाचा प्रश्न कायमचा निकालात काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच पाटण पोलिसांच्याही हक्काच्या घरांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्यशासनाकडून पाटण पोलिसांच्या घरासाठी तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
राज्यातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी फडणवीस सरकार गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये तसे वक्तव्येही केले होते. पाटणमध्ये झालेल्या दौऱ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तसे विधान केले होते.
सर्वसामान्यांचे रक्षण करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे महाराष्ट्र पोलीस स्वत:च्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. ज्या घरांमध्ये ते राहतात ती घरे अनेकवेळा धोकादायक असल्याचे चित्र समोर आले होते. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने पोलिसांच्या घरांचा प्रश्न गांभीयार्ने घेण्यास सुरुवात
केली.
पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनीही तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ९६ कोटी रुपयांचा निधी मिळविताना विधिमंडळाच्या अधिवेशनात पाटण पोलिसांच्या घरांचा प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला होता.
त्याचेच फलीत म्हणून आता सातारा जिल्ह्यातील पाटणसारख्या दुर्गम भागातील पोलिसांच्या नवीन घरांचा प्रश्न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने पाटण पोलिसांच्या नवीन सुसज्ज सदनिकेसाठी तब्बल २ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
या निधीतून पाटण पोलिसांसाठी एकूण बारा नवीन सुसज्ज घरांचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घरांच्या बांधकामासाठी नवीन जागा निश्चिती करण्यात येत आहे.
(वार्ताहर)

सर्व सुविधांचा समावेश : गिड्डे
पाटण येथे १९०१ साली ब्रीटीश कालीन पोलीस चाळ बाधली होती.११५ वर्षा पूवीर्ची ६ खोल्यांची एक अशा दोन बारा खोल्यांची व दोन अधिकारी यांच्या साठी दोन अशा ३ कोटी बजेट असलेले कर्मचारी आर सीसी निवास बांधण्याचे काम सुरू आहे.त्याकरीता जुनी इमारत पाडून त्या जागेवर सर्व सोईनीयुक्त पोलीसांची घरे होत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक संजय गिड्डे यांनी दिली.
जिल्ह्यातील पोलिसांची प्रतीक्षा
पाटणप्रमाणेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांसाठी घरे बांधून द्यावेत, अशी मागणी पोलिसांमधून होत आहे.

Web Title: Patan police will get rightful houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.