पाटणला महाविकास आघाडीत धुसफूस कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:28+5:302021-06-30T04:25:28+5:30

पाटण : राज्याच्या सत्तेत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी येऊन जवळपास दीड वर्षे झाले. या दरम्यान ...

Patan remains in disarray in Mahavikas front | पाटणला महाविकास आघाडीत धुसफूस कायम

पाटणला महाविकास आघाडीत धुसफूस कायम

Next

पाटण : राज्याच्या सत्तेत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी येऊन जवळपास दीड वर्षे झाले. या दरम्यान पाटण तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी आणि कार्यक्रम झाले. परंतु मनापासून तालुक्यातील दोन्ही दिग्गज एकमेकांसोबत बोलताना किंवा एकत्र आल्याचे जनतेला दिसलेले नाही.

शंभूराज देसाई आणि सत्यजित यांनी एकमेकांविरोधात श्रेयवाद आणि चढाओढ केल्याचे अप्रत्यक्षपणे दिसून आले. घाणबी आरोग्य केंद्रसाठीचा श्रेयवाद असो किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या ऑनलाइन उपस्थित मल्हार पेठ येथील कार्यक्रमात पाटणकर गटाची अनुपस्थिती असेल. त्यामुळे पाटणला महाविकास आघाडीत धुसफूस कायम असल्याची जाणवते. विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई हे सत्यजित पाटणकर यांचा पराभव करून आमदार झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे फिरली आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन होऊन सरकार स्थापन झाले.

शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री झाले. त्यानंतर पाटण तालुक्यात देसाई आणि पाटणकर गटाचे मनोमीलन होऊन राजकीय संघर्षाला विराम मिळेल असे सुरुवातीला वाटले होते. त्याचा प्रत्यय शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आला. या निवडणुकीतील विजयासाठी श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशामुळे शंभूराज देसाई आणि सत्यजीतसिंह पाटणकर हे एकमेकांच्या हातात हात घालून प्रचार करताना दिसले. पुढे कायम यांचे मनोमिलन वरकरणी ठरल्याचे दिसले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि शरद पवार यांचे सख्य जमले. त्यामुळे मंत्री शंभूराजे देसाई यांनी पाटणकर यांच्या विरोधातील नेहमीप्रमाणेचा पवित्रा आवरता घेतला. सहाजिकच माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांनीही मंत्री देसाई यांच्याविरोधात बोलणे टाळले. कोरोनात जनतेला मदत करताना देसाई आणि पाटणकर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी चढाओढ करून कोरोना सेंटर उभारणे असो किंवा इतर मदत त्यासाठी अप्रत्यक्षपणे स्वतंत्रकाम केल्याचे दिसत आहे.

कोरोनात सापडलेल्या गावांना महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे न जाता एकामागून एक स्वतंत्र भेटी दोन्ही नेत्यांनी दिल्या. त्यानंतर जिल्हा बँकेमार्फत दिलेले ऑक्सिजन सिलिंडर किंवा बेड यामध्ये दोन्ही नेत्यांनी हे मीच केले असा श्रेयवाद घडवून आणला. घाणबी येथे आरोग्य केंद्र सुरू करताना चढाओढ दिसून आली. मंत्री देसाई यांनी हे आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी बैठक घेताच तिकडे सत्यजित पाटणकर यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून आणि तेथील लोकांच्या संख्याबळावर हे आरोग्य केंद्र सुरू केल्याचे जाहीर केले म्हणूनच पाटणमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे दिसते.

चौकट

मल्हारपेठ येथील पोलीस स्टेशन इमारत आणि पोलीस वसाहतीचे भूमिपूजन शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मंत्र्यांना ई-प्रणालीद्वारे बोलावून मोठा कार्यक्रम तालुक्यात पार पडला; परंतु यामध्ये पाटणकर गटाचे नेते किंवा कार्यकर्ते दिसले नाहीत, त्यामागे नेमके कोणते कारण होते की त्यांना निमंत्रण दिले नव्हते.

चौकट

आगामी निवडणुकांकडे लक्ष

येत्या सहा महिन्यांत जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होऊ शकते. यामध्ये राज्याच्या श्रेष्ठींनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढविण्याच्या निर्णय घेतला तर या नेत्यांना हा निर्णय कितपत अंगवळणी पडेल हे पाहावे लागणार आहे.

चौकट

काँग्रेसची फक्त बघ्याची भूमिका

पाटण तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीत देसाई आणि पाटणकर गट ठळकपणे कार्यरत असताना दिसतात मात्र महाविकास आघाडीतील सत्तेचा भाग असलेली काँग्रेस काही करताना दिसत नाही. त्यांची फक्त बघ्याची भूमिका असल्याचे दिसते.

Web Title: Patan remains in disarray in Mahavikas front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.