पाटणवासीय घनकचऱ्याच्या विळख्यात

By admin | Published: September 4, 2015 08:28 PM2015-09-04T20:28:40+5:302015-09-04T20:28:40+5:30

जागा नसल्याने धोका : रोज होतो एक टन कचरा गोळा

In Patan residential solidification | पाटणवासीय घनकचऱ्याच्या विळख्यात

पाटणवासीय घनकचऱ्याच्या विळख्यात

Next

नाटोशी : गेल्या काही वर्षांत पाटणचा झपाट्याने विकास झाला़ यामुळे शहराबरोबरच लोकसंख्या ही वाढली आहे़ आज १५ ते २० हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या शहरास घनकचरा टाकण्यासाठी स्वत:ची जागा नसल्याने पाटणवासीय घनकचऱ्याच्या विळख्यात सापडले आहेत़ पाटण हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील कचेरी, पंचायत समिती, न्यायालय, महाविद्यालय, तीन माध्यमिक विद्यालये आणि याचबरोबर अनेक शासकीय कार्यालये आहेत़ त्यामुळे पाटणमध्ये भाजी मार्केट, हॉटेल्स, स्टेशनरी दुकाने, हॉस्पिटल्स यांचा विकास झाला आहे़ सकाळी सात वाजल्यापासून दुपारी १ पर्यंत १ घंटागाडी आणि ग्रामपंचायत ट्रॅक्टर पाटण शहरातून किमान एक टन कचरा गोळा करत आहे. हा कचरा गोळा करत असताना ग्रामस्थ ओला व सुका कचरा हा वेगळा करत नाहीत़ तो एकत्र टाकला जातोय़ या कचऱ्यामध्ये खराब कपडे, सिमेंटची पोती, प्लास्टिक कागद, दुधाच्या, प्लास्टिक पिशवी, खराब हिरव्या पालेभाजा, क्लिनिकमधील कचरा आदी सर्व एकत्र गोळा केले जाते. त्याचबरोबर सायंकाळी रामापूर ते केरा पूल यादरम्यान किमान २० हॉटेल्स, दुकाने, चहाचे गाडे, वडापावच्या गाड्या येथूनही ओला कचरा गोळा केला जातो़ हा जमा झालेला कचरा हा कोठे तरी मोकळ्या जागेत टाकला जातो, त्यामुळे कचरा टाकलेल्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली जात असून लोकांच्या ओराग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़  हा कचरा असाच वाढत राहिल्यास पाटण शहरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल़ मार्केटयार्ड ते विठ्ठल मंदिराकडे जाणारा रस्ता, केरा पूल, कळकेचाळीकडे जाणारा रस्ता, धांडे पूल, पाटण बस स्टेशन, या परिसरात घाणीचे साम्राज्य जास्त असते. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ (वार्ताहर)


घनकचरा या प्रश्नाचा विचार हा समाजातील सामाजिक संघटना, रोटरी क्लब, गणेशोत्सव मंडळ, बचत गट यांनी करून घनकचरा व्यवस्थानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे़ घनकचरा होणार नाही, यांची प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे़ घरातून निघतानाच बाजारासाठी कापडी पिशवीच घेऊन बाहेर पडावे़ दुकानदार प्लास्टिक पिशवी देत असल्यास त्यास विरोध करावा़. --- लक्ष्मण चव्हाण, ग्रामस्थ, पाटण

पर्यावरणाचे रक्षण करणे, हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे आणि यांची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करावी़ आपल्या घरासमोर परिसर प्रत्येकानेच स्वच्छ ठेवावेत आणि संदूर पाटण ठेवण्यास सर्वांनी मदत करावी़
-चंद्रकांम मोरे, उपसरपंच, पाटण
दुधाच्या पिशव्या, तेलाच्या पिशव्या आदी प्लास्टिक एकत्र करून भंगारात घालाव्यात़ प्रत्येकानेच आपल्या मोकळ्या जागेत घनकचरा ओला व सुखा कचराऱ्याचे विभाजन करून त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे़ ओला कचरा प्रत्येकाने आपल्या परस बागेत सेंद्रिय खत म्हणून वापर केला पाहिजे़   -अजय कवडे, ग्रामपंचायत सदस्य,

Web Title: In Patan residential solidification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.