पाटणला गावागावांत डरकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:24 PM2018-12-30T22:24:23+5:302018-12-30T22:24:28+5:30

मल्हारपेठ : कºहाडसह पाटण तालुक्याच्या डोंगररांगांमध्ये डरकाळी फोडणारा बिबट्या सध्या मात्र नागरी वस्तीत शिरकाव करू लागलाय. तालुक्यांतील अनेक गावांमध्ये ...

Patan sobbed in the village | पाटणला गावागावांत डरकाळी

पाटणला गावागावांत डरकाळी

Next


मल्हारपेठ : कºहाडसह पाटण तालुक्याच्या डोंगररांगांमध्ये डरकाळी फोडणारा बिबट्या सध्या मात्र नागरी वस्तीत शिरकाव करू लागलाय. तालुक्यांतील अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होत असून, त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा नागरी वस्तीतील हा वाढता वावर भविष्यात चिंतेचा विषय ठरू शकतो, अशी शक्यता प्राणीमित्रांकडून व्यक्त केली जात आहे.
गत काही वर्षांपूर्वी कºहाड तालुक्यातील पाठरवाडीचा वाघधुंडी परिसर बिबट्यासह अन्य श्वापदांचे आश्रयस्थान मानले जात होते. वाघधुंडी परिसरात हमखास बिबट्या दिसायचा. त्यामुळे त्या परिसरात कोणीही फिरकत नव्हते. कालांतराने बिबट्या पाठरवाडीसह गमेवाडी, आरेवाडी, डेळेवाडी गावांच्या शिवारात दिसू लागला. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले. मात्र, काही वर्षांतच बिबट्याचा वावर एवढा वाढला की, कºहाड तालुक्यातील बहुतांश गावे भीतीच्या छायेखाली गेली. सध्या कºहाड तालुक्यातील वाठार, काले, नांदगाव, ओंड, उंडाळे, येवती, आरेवाडी, तांबवे, डेळेवाडी, उत्तर तांबवे, तळबीड या परिसरात बिबट्या पाहिल्याचे सांगितले जाते. या गावांसह आसपासच्या अन्य गावांतील ग्रामस्थही दहशतीखाली राहत आहेत.
पाटण तालुक्यातील परिस्थितीही याहून वेगळी नाही. तालुक्यातील बहुतांश गावे डोंगर कपारीत वसली आहेत. या गावांच्या आसपास अनेकवेळा बिबट्या दिसतो. यापूर्वी त्याचा वावर नजीकच्या शिवारात असायचा. मात्र, सध्या तो गावामध्ये घुसून शेडमध्ये बांधलेल्या जनावरांवरही हल्ला करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाळीव जनावरेही सुरक्षित नसल्याची परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी दोन बिबट्यांनी उरूल घाटात रस्त्याकडेला तासभर ठिय्या मांडला होता. बघ्यांची गर्दी झाली असतानाही ते तेथून हलले नाहीत. त्यानंतर कोळेकरवाडीकडेही त्याने आपला मोर्चा वळवला. सध्या कºहाड आणि पाटण तालुक्यांतील बहुतांश गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून, पाळीव जनावरांवरील हल्ल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते.
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे आवश्यक ती सामुग्री नाही. त्यामुळे अनेकवेळा बिबट्या समोर असुनही वन विभाग काहीच करू शकत नाही.
बिबट्या किती..? वनविभाग अनभिज्ञ
कºहाडसह पाटण तालुक्यामध्ये ज्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढत आहे, त्या प्रमाणात त्यांची देखरेख केली जात नसल्याचे नसते. एखाद्या ठिकाणी बिबट्या दिसलाच तर त्यापुढील त्याच्या हालचालीची कोणतीही माहिती वनविभागाला नसते. संबंधित बिबट्याचा अधिवास, वावरक्षेत्र याबाबत वनविभाग पूर्णपणे अनभिज्ञ असतो. त्यामुळे परिसरात बिबट्यांची संख्या किती आहे, याबाबतही ठोस माहिती वनविभागाला उपलब्ध होत नाही.
बिबट्याप्रवण क्षेत्रात होतेय वाढ
ज्या-ज्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होते, अशा ठिकाणांची वनविभागाकडून नोंद ठेवली जाते. कºहाड तालुक्यात गतवर्षी पूर्वीच्या नोंदींसह आणखी ३९ ठिकाणी बिबट्यांचे दर्शन झाल्याचे वनविभागाची आकडेवारी सांगते. यावरून विभागात बिबट्यांची संख्या वाढल्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही वाढती संख्या व मानवी वस्तीत होणारा शिरकाव लक्षात घेता वन व वन्यजीव विभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध होणे गरजेचे आहे.

Web Title: Patan sobbed in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.