पाटण तालुक्याला मोठ्या निधीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:24+5:302021-07-28T04:40:24+5:30
ढेबेवाडी विभागातील जिंती, जितकरवाडी, धनावडेवाडी, शिंदेवाडी आदी गावांचा पाहणी दौरा हिंदुराव पाटील यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते. मंडलाधिकारी ...
ढेबेवाडी विभागातील जिंती, जितकरवाडी, धनावडेवाडी, शिंदेवाडी आदी गावांचा पाहणी दौरा हिंदुराव पाटील यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते. मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, तलाठी डी. डी. डोंगरे, जिंतीचे उपसरपंच उमेश चव्हाण, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रदीप पाटील, युवकचे सरचिटणीस संदीप पवार, काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष मेघराज धस उपस्थित होते.
हिंदुराव पाटील म्हणाले, पाटण तालुक्यातील रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे नदीकाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तसेच नदीवरील छोटे मोठे पूल, जमिनी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. डोंगराच्या खालील बाजूला असणाऱ्या गावांना दरडीचा धोका आहे. त्यामुळे त्या गावांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. आजच्या अतिवृष्टीची परिस्थिती पाहता मन हेलावून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिंती, जितकरवाडी, धनावडेवाडी, शिंदेवाडी, आंबेघर, दीक्षी, गुंजाळी, शिद्रुकवाडी, काहीर, हुंबरणे, मिरगाव, कामारगाव यासारखी अनेक गावे डोंगर कपारीत वसली आहेत. त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे.
- चौकट
जिंती, जितकरवाडी येथील ग्रामस्थांचे स्थलांतर जिंती येथील माध्यमिक विद्यालयात करण्यात आले आहे; तर धनावडेवाडी व शिंदेवाडी येथील ग्रामस्थांचे स्थलांतर ढेबेवाडी येथील साई मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. या ग्रामस्थांना पूर्णपणे सहकार्य करू, असे आश्वासन यावेळी हिंदुराव पाटील यांनी दिले.
फोटो : २७केआरडी०१
कॅप्शन : ढेबेवाडी विभागातील पूरग्रस्त भागाची पाहणी काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील यांनी केली. (छाया : बाळासाहेब रोडे)