पाटणला कडकनाथकडून दोनशे जणांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 04:17 PM2019-09-03T16:17:24+5:302019-09-03T16:24:49+5:30

पाटण तालुक्यातील जवळपास दोनशेजणांची महारयत या कंपनीच्या कडकनाथवर विश्वास ठेवून अंडी उत्पादन व कोंबडी पालन अशा व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, सध्या कडकनाथकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. याबाबत आंदोलन करण्याचा निर्णय पाटण येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला.

Pathan cheats two hundred from Kadaknath | पाटणला कडकनाथकडून दोनशे जणांची फसवणूक

पाटणला कडकनाथकडून दोनशे जणांची फसवणूक

Next
ठळक मुद्देपाटणला कडकनाथकडून दोनशे जणांची फसवणूकगुंतवणूकदार हवालदिल : लाखो रुपयांचा घातला गंडा

पाटण : पाटण तालुक्यातील जवळपास दोनशेजणांची महारयत या कंपनीच्या कडकनाथवर विश्वास ठेवून अंडी उत्पादन व कोंबडी पालन अशा व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, सध्या कडकनाथकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. याबाबत आंदोलन करण्याचा निर्णय पाटण येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला.

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी शेतकऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर आणि विक्रमबाबा पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटण तालुक्यातील मोरगिरी, तारळे, चाफळ, पाटण, ढेबेवाडी, मल्हारपेठ विभागात लोकांनी गुंतवणूक करून स्वखर्चाने कोंबडी पालनासाठी मोठी शेड्स उभी केलेली आहेत आणि कडकनाथकडे डिपॉझिट म्हणून लाखो रुपये ठेवले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी तीन-तीन महिने कष्ट घेऊन कोंबडी पिलांचे संगोपन केले.

यातून काहीतरी फायदा होईल म्हणून परिश्रम घेतले आणि जास्त वजनाच्या झालेल्या कोंबड्या संबंधित कंपनीकडे सुपूर्द केल्या तर अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे पालन केले. त्यातून मिळविलेली अंडी कडकनाथला दिली. परंतु त्याचे पैसे मात्र कडकनाथकडून संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले नाहीत.

पाटण तालुक्यातील सुमारे १८० जणांचे लाखो रुपयांचे येणे कडकनाथ कंपनीकडून आहे. याबाबत लवकरच तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन करण्याच्या निर्णय संबंधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. या शेतकऱ्यांसमवेत पाटण येथील शासकीय विश्रामगृहात श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व विक्रमबाबा पाटणकर यांची एक बैठक पार पडली. व या बैठकीत करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत दोघांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 

Web Title: Pathan cheats two hundred from Kadaknath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.