पाठरवाडीचा पाणीप्रश्न अखेर निकालात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:25 AM2021-06-29T04:25:42+5:302021-06-29T04:25:42+5:30

तांबवे : डोंगर पठारावर वसलेल्या पाठरवाडी (ता. कऱ्हाड) येथील ग्रामस्थांचा पाणीप्रश्न निकालात निघाला आहे. रोटरी क्लबने तेथे पाच ...

Patharwadi water issue finally resolved | पाठरवाडीचा पाणीप्रश्न अखेर निकालात

पाठरवाडीचा पाणीप्रश्न अखेर निकालात

Next

तांबवे : डोंगर पठारावर वसलेल्या पाठरवाडी (ता. कऱ्हाड) येथील ग्रामस्थांचा पाणीप्रश्न निकालात निघाला आहे. रोटरी क्लबने तेथे पाच हजार लीटरच्या चार पाण्याच्या टाक्या दिल्या असून, ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय यामुळे दूर झाली आहे.

पाठरवाडी हे गाव डोंगरावर वसले आहे. गमेवाडी ग्रामपंचायतीमार्फत तेथील कारभार पाहिला जातो. माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांनी पाठरवाडी या डोंगरावर वसलेल्या वाडीला गमेवाडीतून पाणी नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची चांगली सोय झाली होती. मात्र, तेथे असलेली पाण्याची टाकी अनेक वर्षांपूर्वी बांधलेली असून, त्या टाकीतील पाणी ग्रामस्थांना पुरत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. कमी दाबाने पाणी मिळत होते. तत्कालीन प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करत ग्रामस्थांकडून अडचणीची माहिती घेतली. त्याचदरम्यान रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. राहुल फासे व सचिव प्रबोध पुरोहित यांनी प्रांताधिकारी खराडे यांची भेट घेऊन रोटरीतर्फे कोणते सामाजिक काम करता येईल का, अशी विचारणा केली. त्यावेळी प्रांताधिकारी खराडे यांनी पाठरवाडीतील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करा, असे सांगितले. डॉ. राहुल फासे, प्रबोध पुरोहित, प्रकल्पप्रमुख राजेश खराटे यांनी संतोष जाधव व हेमंत पवार यांच्या मदतीने पाठरवाडीत जाऊन तेथील पाण्याच्या गैरसोयीची वस्तुस्थिती पाहिली. तेथे पाच हजार लीटरच्या प्लास्टिकच्या चार टाक्यांव्दारे पाणी देण्याचे नियोजन केले. त्यासाठी दीड वर्षे मेहनत घेऊन त्यांनी हे जिकरीचे काम पूर्ण केले. त्याव्दारे आता ग्रामस्थांना पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे.

या पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, डॉ. राहुल फासे, प्रबोध पुरोहित, संतोष जाधव, क्लबचे अध्यक्ष गजानन माने, सचिव डॉ. शेखर कोगनुळकर, डॉ. संतोष टकले, रोटरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रणजित शेवाळे, सचिव किरण जाधव, जगदीश वाघ, वैभव कांबळे, सुनील यादव, पांडुरंग यादव, विठ्ठल यादव, पोलीस पाटील सागर यादव, आनंदा यादव, विनायक यादव यांच्या उपस्थितीत झाले.

फोटो : २८ केआरडी ०३

कॅप्शन : पाठरवाडी (ता. कऱ्हाड) येथे रोटरी क्लबकडून देण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते झाले.

Web Title: Patharwadi water issue finally resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.