बिबी विलगीकरण कक्षातील रुग्ण भजन, प्रवचनात मंत्रमुग्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:59+5:302021-06-03T04:27:59+5:30

आदर्की : फलटण पश्चिम भागात विविध संस्था व लोकवर्गणीतून सुरू केलेल्या विलगीकरण कक्षातील कोरोना रुग्ण, प्राणायम, भजन, प्रवचनाने ...

Patient hymns in the Bibi separation room, mesmerized by the discourse! | बिबी विलगीकरण कक्षातील रुग्ण भजन, प्रवचनात मंत्रमुग्ध!

बिबी विलगीकरण कक्षातील रुग्ण भजन, प्रवचनात मंत्रमुग्ध!

Next

आदर्की : फलटण पश्चिम भागात विविध संस्था व लोकवर्गणीतून सुरू केलेल्या विलगीकरण कक्षातील कोरोना रुग्ण, प्राणायम, भजन, प्रवचनाने मंत्रमुग्ध होत असल्याचे चित्र बिबी येथील विलगीकरण कक्षात दिसत आहे.

बिबी, ता. फलटण येथे गत महिन्यात कोरोना संसर्ग वाढला होता. त्यामुळे मृत्यूदरही वाढला होता. ती साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायत, मारुती देवस्थान ट्रस्ट व लोकवर्गणीतून प्रारंभी पंचवीस बेडचे व रुग्णसंख्या वाढल्याने चाळीस बेडचा विलगीकरण कक्ष सरस्वती माध्यमिक विद्यालयात सुरू करण्यात आला. त्यामध्ये रुग्णांना चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण मोफत ग्रामस्थ व अन्नदाते देत आहेत. गावातील डॉक्टर रुग्णांची आरोग्य तपासणी करीत आहेत, तर रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सकाळी प्राणायम व सायंकाळी भजन व प्रवचन यामुळे बिबी विलगीकरण कक्षातील कोरोना रुग्ण मंत्रमुग्ध होत आहेत. यासाठी प्रवचनकार विजय बोबडे, प्रमोद बोबडे, आप्पासाहेब मोरे, मोहन बोबडे आदी ग्रामस्थ, तरुण मंडळ, स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

०२आदर्की

बिबी (ता. फलटण) येथे कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्ण प्राणायम करताना पाहायला मिळत आहेत.

Web Title: Patient hymns in the Bibi separation room, mesmerized by the discourse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.