औंध येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांचे पाण्यावाचून हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:34+5:302021-07-01T04:26:34+5:30
औंध: औंध येथील पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने तोडल्याने औंध कोरोना सेंटरमधील रुग्णांचे प्रचंड हाल होऊ ...
औंध: औंध येथील पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने तोडल्याने औंध कोरोना सेंटरमधील रुग्णांचे प्रचंड हाल होऊ लागले असून, वीजवितरण कंपनीने ऐन कोरोना काळात त्रस्त जनतेचा अंत पाहू नये, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व रुग्णांच्या नातेवाइकांमधून व्यक्त केल्या जात आहेत .
याबाबत अधिक माहिती अशी, मागील काही दिवसांपासून औंधसह परिसरातील अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन वीजवितरण कंपनीने तोडले आहे. त्यामुळे औंध येथील कोरोना सेंटरसह औंध गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कोरोना सेंटरमध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून पाण्याची गैरसोय निर्माण झाल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेचा, आरोग्याचा प्रश्न ही निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. याबाबत त्वरित कारवाई करून औंध येथील कोरोना सेंटरचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे औंध ग्रामपंचायतीने तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.