समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांना फटका : वैराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:36 AM2021-04-13T04:36:56+5:302021-04-13T04:36:56+5:30

वाई : सध्या वाई शहरात कोरोनाचा कहर वाढलेला दिसून येत आहे. वाई नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सतीश वैराट हे ...

Patients hit due to lack of coordination: Vairat | समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांना फटका : वैराट

समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांना फटका : वैराट

Next

वाई : सध्या वाई शहरात कोरोनाचा कहर वाढलेला दिसून येत आहे. वाई नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सतीश वैराट हे स्वत: काही दिवसांपासून कोरोना लढाईत सातत्याने व प्रभावीपणे सोशल मीडियाच्या व इतर पध्दतीने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये त्यांनी वाईच्या मुख्याधिकारी त्यांना दिलेल्या निवासस्थानी राहात नसल्याचे निदर्शनास आणले. तसेच प्रत्यक्षात नगरपरिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाकडे होम आयसोलेशन व कोरोनाशी संबंधित माहिती घेण्यात येत असते. परंतु त्या विभागावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते.

पदाधिकारी यांना माहिती न देता बांधकाम व आरोग्य विभागात कोरोनाच्या नावाखाली लाखो रुपयांची कामे होतात व बिले मंजूर होतात. मात्र, लोकांच्या हिताची कामे करण्यास त्यांना वेळ नाही, अशी परिस्थिती तिथे असल्याचे दिसून येत आहे. सतीश वैराट यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची चाचणी केल्यानंतर रुग्ण दाखल पॉझिटिव्ह आल्यावर किंवा होम आयसोलेशन केल्यास त्याची माहिती नगर परिषदेस द्यायला हवी आहे. परंतु तसे होत नाही. त्यामुळे माहिती मिळत नाही. वैराट यांनी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व नगर परिषदेच्या लोकांना याबद्दल जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. ही परिस्थिती पाहता अशा वेळेस सर्वांनी समन्वयाने काम करुन कोरोनाला हरवण्यास मदत केली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. नाहीतर वाईतील जनता यांना कधीच माफ करणार नाही, असेही वैराट यांनी सांगितले.

Web Title: Patients hit due to lack of coordination: Vairat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.