देशभक्ती अन् भावूकता.... उदयनराजेंच्या जन्मदिनी 140 शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 08:51 AM2019-02-25T08:51:56+5:302019-02-25T08:52:41+5:30
उदयनराजेंनी यंदाचा वाढदिवस साजरा न करता, सातारा जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करुन तो दिवस शहिदांच्या सन्मानार्थ घालवला
सातारा - साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच त्यांच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. रविवारीही त्याची ही हटके स्टाईल साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला. उदयनराजेंनी यंदाचा आपला वाढदिवस साताऱ्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमवेत साजरा केला. पुलवामा येथे भारतमातेच्या 41 जवानांनी आपला जीव गमावला, त्यामुळे यंदा माझा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना केलं होतं.
उदयनराजेंनी यंदाचा वाढदिवस साजरा न करता, सातारा जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करुन तो दिवस शहिदांच्या सन्मानार्थ घालवला. तसेच या कार्यक्रमात सर्वप्रथम पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजलीही वाहण्यात आली. कराडमधील प्रितीसंगम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदयनराजेंकडून साताऱ्यातील 140 शहीद कुटुबींयांचा सन्मान करण्यात आला. गावाकडच्या मुलाने भारतमातेसाठी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेऊन या वीरमाता-पितांचा सन्मान उदयनराजेंनी केला. या कार्यक्रमाला साताऱ्यातील जवानही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमात एकीकडे भावूकता तर दुसरीकडे देशभक्तीचा रंग चढल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, उदयनराजेंनी नेहमीच्या स्टाईले वीर माता-पितांचा सन्मान करताना, अगदी आपुलकीने विचारपूस केली. तर राजेंच्या हातून पुरस्कार स्विकारताना वीरमाता आणि वीरपितांना आपल्या शहीद मुलांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले होते.
वीरस्मरण 🇮🇳
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 24, 2019
सातारा जिल्ह्यातील १४० शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान व पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली. pic.twitter.com/vxjgBg6fV5
वीरस्मरण 🇮🇳
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 24, 2019
आजचा वाढदिवस वीर जवानांसोबत. pic.twitter.com/pQubs9NOEl