विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती, देशसेवेची भावना -सैनिक प्रायमरी शाळा : माझी शाळा माझा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:21 PM2018-09-12T23:21:14+5:302018-09-12T23:22:19+5:30
शाळेच्या स्थापनेनुसार आजपर्यंत अनेक विद्यार्थी यशस्वी व तितक्याच ताठ मानेनं जगताना दिसत आहेत.
योगेश घोडके ।
सातारा : शाळेच्या स्थापनेनुसार आजपर्यंत अनेक विद्यार्थी यशस्वी व तितक्याच ताठ मानेनं जगताना दिसत आहेत. शाळेच्या नावाप्रमाणेच शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सैनिकी शिक्षणाचे बाळकडू त्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न या शाळेचा माध्यमातून केला जातो. महाराष्ट्रातील एकमेव नामांकित केंद्रीय सैनिक शाळेत सैनिक शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती व देशसेवेची भावना निर्माण केली जाते.
या शाळेतील मुलांच्यात लहान गट ते पाचवीपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास, जिद्द, आत्मसन्मान ही बीजं लहान गटातच रोवली जातात. शाळेत अगदी लहान गटापासून विविध स्पर्धा घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास, धाडसी वृत्ती, स्वावलंबन या सुप्त गुणांना वाव दिला जातो. महाराष्ट्रातील एकमेव नामांकित केंद्रीय सैनिक शाळात सैनिक शिक्षण दिले जाते.
या शाळेत निबंध, वक्तृत्व, केझी हॅट, विविध गुणदर्शनाचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, मैदानी सामने घेऊन मुलांना तणावमुक्त शिक्षण देण्यात येते. तसेच प्रश्नमंजूषासारख्या स्पर्धा घेऊन तसेच ग्रंथालयातील प्रस्तकांच्या वाचनातून विद्यार्थ्यांच्यात ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न होतो व याचा लाभ शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला होतो.
साताराच्या सुपुत्रांचा कॅप्टनपदी मानाचा तुरा
प्रायमरी सैनिक शाळेचे विद्यार्थी व सातारचे सुपुत्र अभिषेक वीर व कुलदीप पवार होय. यांनी अगदी लहान वयातच कॅप्टन होण्याचा मान आपल्या शिरपेचात चढविला आहे. यासारख्या अनेक अधिकारी लहान विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायक ठरेल.
प्रायमरी सैनिक शाळेची वैशिष्ट्ये
प्रशस्त इमारत
संपूर्ण डिजिटल वर्ग
अनुभवी शिक्षक वर्ग
तणावमुक्त शिक्षण पद्धती
संपूर्ण सैनिकी शिक्षणपद्धत
जलतरण व घोडेसवारीसारखे विशेष प्रशिक्षण मुलांना देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. सैनिक शाळेप्रमाणेच प्रायमरी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी ही शाळा नेहमीच प्रयत्नशील असते.
-तेजस्विता धुमाळ, मुख्याध्यापिका,
प्रायमरी सैनिक शाळा