कऱ्हाड सह पाटणला वादळाचा तडाखा, घरांवरील पत्रे उडाले; झाडे मोडून पडल्याने वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:52 PM2018-04-16T23:52:52+5:302018-04-16T23:52:52+5:30

कऱ्हाड /पाटण/मसूर : कºहाड तालुक्यासह पाटणच्या काही भागाला सोमवारी दुपारी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला.

 Patrol hit with Karhad, storm hits home; Break the plants and break the power | कऱ्हाड सह पाटणला वादळाचा तडाखा, घरांवरील पत्रे उडाले; झाडे मोडून पडल्याने वीज खंडित

कऱ्हाड सह पाटणला वादळाचा तडाखा, घरांवरील पत्रे उडाले; झाडे मोडून पडल्याने वीज खंडित

Next
ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : ; आंबा पिकाची मोठी हानी; शेतीची कामे ठप्प

कऱ्हाड /पाटण/मसूर : कºहाड तालुक्यासह पाटणच्या काही भागाला सोमवारी दुपारी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तर काही ठिकाणी झाडे मोडून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. पाटण तालुक्यात वादळी वाºयासह गारांचा मारा बसल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले.
कºहाडसह पाटण तालुक्यात गत काही दिवसांपासून उष्णता वाढली होती. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात असतानाच सोमवारी दुपारी कºहाड तालुक्यातील बेलवडे हवेली, तासवडे, मसूर, अंतवडी, रिसवड परिसराला तसेच पाटण तालुक्यातील काही भागाला वादळी वाºयाचा तडाखा बसला. मसूर, कांबीरवाडी परिसरात वाºयामुळे झाडे मोडून पडली. तर बहरात आलेल्या आंब्यांचा झाडाखाली खच पडून मोठे नुकसान झाले. वादळी वाºयांसह सुमारे दोन तास सुरू असलेल्या पावसाने ग्रामस्थांची त्रेधा उडाली.
मसूर परिसरात दुपारी ढगांच्या गडगडाटासह व विजेच्या आवाजाने रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी निवारा पाहून भयभीत होऊन पावसाच्या उघडीपीची वाट पाहात होते. तर उसाने भरलेल्या बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून गाडीवान आसरा घेऊन बसले होते. वाºयाचा वेग एवढा होता की घरावरील पत्रे अक्षरश: उडून जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर मसूर-उंब्रज रस्त्यावर संघाच्या पेट्रोल पंपाशेजारी झाड पडल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प होती. या पावसाने शेतात पाणी साचले होते. तर मसूरच्या मुख्य चौकात असणारे खड्डे भरल्याने तेथे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. मसूर-उंब्रज रस्त्यावर गटाराचे पाणी आल्याने प्रवाशांना या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत होता. सुमारे दोन तास वादळी वाºयासह पडलेल्या पावसाने वीज गायब झाली.
बेलवडे हवेली, तासवडे परिसरालाही वादळी वाºयाचा तडाखा बसला. दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह वादळी वाºयाला सुरुवात झाली. त्यामुळे काही ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडून गेले. तर काही ठिकाणी झाडे मोडून रस्त्यावर कोसळली. यावेळी विभागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान, पाटण तालुक्यालाही वादळी वाºयासह पावसाने झोडपून काढले. सोमवारी दुपारी अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाली. यामध्ये आंब्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आंब्यांच्या झाडांखाली अक्षरश: सडा पडलेला दिसून येत होता. अचानक झालेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय काजू, चिक्कू फळांनाही या वादळी पावसाचा तडाखा बसला आहे.

झाड कोसळल्याने दुचाकीचा चक्काचूर
बेलवडे हवेलीसह तासवडे परिसराला सोमवारी दुपारी वादळी वाºयाचा तडाखा बसला. यावेळी काही प्रवाशांनी आपल्या दुचाकी झाडाखाली उभ्या करून ते निवाºयाला थांबले होते. त्यावेळी एक झाड मोडून रामचंद्र दशरथ पवार यांच्या दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. वादळी वारे तसेच पाऊस बंद झाल्यानंतर ग्रामस्थांनी झाड तोडून दुचाकी बाजूला काढली.
बेलवडे हवेली परिसरात पत्रे उडून गेल्याने नुकसान
बेलवडे हवेली येथील श्रीकांत रामचंद्र पवार, बाळकृष्ण पवार, उत्तम अण्णा पवार यांचे जनावरांच्या शेडचे पत्रे उडून गेले. गावातील शाळेनजीक असणाºया अंकुश शिवाजी पवार, राजेंद्र कृष्णात ताटे, अनिल श्रीरंग पवार, सुनील श्रीरंग पवार, रामकृष्ण दत्तात्रय पाटील यांची पत्र्याची शेड उडून गेल्याने नुकसान
झाले आहे.

Web Title:  Patrol hit with Karhad, storm hits home; Break the plants and break the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.