खचलेला रस्ता अखेर पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:03+5:302021-08-13T04:44:03+5:30
गुढे पाचगणी ते भूरभुशी हा सातारा व सांगली जिल्ह्यांची हद्द जोडणारा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याचे नूतनीकरण व ...
गुढे पाचगणी ते भूरभुशी हा सातारा व सांगली जिल्ह्यांची हद्द जोडणारा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर आलेल्या पहिल्याच पावसात अतिवृष्टी होऊन हा रस्ता सुमारे १० ते १५ फूट रुंद व खोल खचला. त्यामुळे सातारा व सांगली जिल्ह्यांचे दळणवळण पूर्णत: ठप्प झाले. या गोष्टीचा विचार करून सातारा जिल्ह्यातील बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत या रस्त्याचा सर्व्हे केला. सातारा व सांगली जिल्हा दळणवळण पूर्ववत व्हावे, यासाठी हा रस्ता साध्या पद्धतीने दगड, मुरूम टाकून भरून पूर्ववत केला. त्यामुळे या रस्त्यावरून ठप्प झालेली दोन जिल्हे जोडणारी वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दोन्ही जिल्ह्यांतील लोकांचा तुटलेला संपर्क पुन्हा जोडला गेला आहे. वाहतूक सुरू झाल्यामुळे या रस्त्यावरून रहदारी वाढली असून ग्रामस्थांसह प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे.