पवनचक्की टॉवरनजीकच्या रहिवाशांचा जीव मुठीत

By admin | Published: July 23, 2015 09:34 PM2015-07-23T21:34:34+5:302015-07-24T00:40:49+5:30

पाटण तालुक्यातील स्थिती : कंपन्यांच्या स्पर्धेमुळे टॉवरचे काम निकृष्ट; प्रशासनाचे दुर्लक्ष

Pawan Chakki Tower residents live for life | पवनचक्की टॉवरनजीकच्या रहिवाशांचा जीव मुठीत

पवनचक्की टॉवरनजीकच्या रहिवाशांचा जीव मुठीत

Next

पाटण : वीजनिर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पाटण तालुक्यात गेल्या काही वर्षांत पवनचक्कीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती झाली. तालुक्यातील प्रत्येक डोंगरपठार पवनचक्कीने वेढला आहे. शेकडो पवनचक्की कंपन्यांनी टॉवर उभारण्याच्या स्पर्धा सुरू केल्या आहेत. या स्पर्धेत टॉवरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, पवनचक्क्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काही कोसळण्याच्या मार्गावर आहेत. कंपन्यांना टॉवर कोसळण्याचे नुकसान नगण्य असले तरी टॉवरच्या आसपास असणाऱ्या गावांना, घरांना, शेतीला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील लोक जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत.
पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठारापासून सुरू झालेली पवनचक्की वाल्मिकी पठार, सडावाघापूर पठार, पांढरेपाणी, काहीर या सर्वच पठारावर पसरलेली आहे. येथे एक ना अनेक कंपन्या पवनचक्की उभारण्यास कार्यरत आहेत. या सर्वच कंपन्यामध्ये टॉवर उभारणीच्या कामात स्पर्धा निर्माण झाली असून, ते काम वेगात सुरू आहे. मात्र, ते लोकांच्या जीवावर बेतण्याच्या अवस्थेत आहे. कारण अनेक ठिकाणच्या पवनचक्क्या कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणच्या पवनचक्क्या अर्धवट अवस्थेत कोसळलेल्या आहेत. त्यामुळे निकृष्ट कामाचा दर्जा येथे पाहावयास मिळत आहे. हजारो टन वजन क्षमतेच्या पवनचक्की टॉवरसाठी तेथील जमिनीतील पाया भक्कम असण्याची गरज असताना व त्या टॉवरची बांधणी हवामान गृहित धरून करणे गरजेचे असताना केवळ स्पर्धेतून दर्जाहीन बांधकाम येथे झाल्याचे दिसून येत आहे. काही पवनचक्क्या पात्यापासून तुटून पडल्या आहेत. तर काही पवनचक्क्या जमिनीतील पायापासूनच उन्मळून पडत असल्याचे समोर येत आहे.
आतापर्यंत पांढरेपाणी, वनकुसवडे, सडावाघापूर, वाल्मिकी आदी पठारावर पवनचक्क्या कोसळल्या आहेत. तर काही पवनचक्क्या पडण्याच्या मार्गावर आहेत. काही पवनचक्क्यांच्या पायथ्याजवळ सध्या डबल स्पेचिंंगचे काम सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Pawan Chakki Tower residents live for life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.