जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:48 PM2021-01-15T12:48:33+5:302021-01-15T12:50:04+5:30

gram panchayat Voting Karad Satara- सातारा जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सर्वच ठिकाणी सकाळच्या टप्प्यात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड, मास्कचा वापर केला तर मतदारांच्या हातावर सॅनिटायझर लावण्याची सक्ती केली आहे.

Peaceful polling for 652 gram panchayats in the district | जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान ठिकठिकाणी रांगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी

सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सर्वच ठिकाणी सकाळच्या टप्प्यात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड, मास्कचा वापर केला तर मतदारांच्या हातावर सॅनिटायझर लावण्याची सक्ती केली आहे.

जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी २ हजार ३८ मतदान केंद्रांवर शुक्रवारी मतदान सुरू आहे. त्यासाठी १९ हजार ४३७ कर्मचारी कार्यरत आहेत. निवडणूक रिंगणात ९ हजार ५२१ उमेदवार उभे आहेत. बहुतांश मतदान केंद्रावर सकाळपासूनच उत्साह दिसून येत होता.

ज्येष्ठ गरिकांना दुचाकी, रिक्षामधून आणले जात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही सूचना केल्या होत्या. त्याचप्रमाणे मतदारांनीही खबरदारी घेल्याचे जाणवत होते. मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यामध्ये मतदारांना मास्कचा वापर केला असून केंद्रात आल्यानंतर मतदारांच्या हातावर सॅनिटायझर दिले जात होते.

Web Title: Peaceful polling for 652 gram panchayats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.