जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:15+5:302021-01-16T04:43:15+5:30
सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सर्वच ठिकाणी सकाळच्या टप्प्यात मतदारांनी रांगा लावल्या ...
सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सर्वच ठिकाणी सकाळच्या टप्प्यात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड, मास्कचा वापर केला तर मतदारांच्या हातावर सॅनिटायझर लावण्याची सक्ती केली आहे.
जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी २ हजार ३८ मतदान केंद्रांवर शुक्रवारी मतदान सुरू आहे. त्यासाठी १९ हजार ४३७ कर्मचारी कार्यरत आहेत. निवडणूक रिंगणात ९ हजार ५२१ उमेदवार उभे आहेत. बहुतांश मतदान केंद्रावर सकाळपासूनच उत्साह दिसून येत होता. ज्येष्ठ गरिकांना दुचाकी, रिक्षामधून आणले जात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही सूचना केल्या होत्या. त्याचप्रमाणे मतदारांनीही खबरदारी घेल्याचे जाणवत होते. मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यामध्ये मतदारांना मास्कचा वापर केला असून केंद्रात आल्यानंतर मतदारांच्या हातावर सॅनिटायझर दिले जात होते.
चौकट :
बोगस मतदान झाल्याचा आरोप
सातारा तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीसाठी परगावाहून आलेल्या व्यक्तींनी मतदान केले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबविण्याची मागणी करण्यात आली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.