नागठाणे परिसरात शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:06+5:302021-01-16T04:43:06+5:30
नागठाणे : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नागठाणे परिसरात शुक्रवारी दुपारपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. भागातील वळसे, बोरगाव, नागठाणे, आदी भागात ...
नागठाणे : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नागठाणे परिसरात शुक्रवारी दुपारपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. भागातील वळसे, बोरगाव, नागठाणे, आदी भागात सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहण्यास मिळाली.
संपूर्ण नागठाणे भागात निवडणुकीमध्ये तरुणाबरोबरच, ज्येष्ठांचा, तसेच वृद्ध व्यक्तींचाही चांगलाच सहभाग दिसून आला. अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या नागठाणे या बाजारपेठेतील गावात सकाळपासूनच मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदाराने मास्क, तसेच सॅनिटायझरचा योग्य वापर करून रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
बोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नागठाणे भागातील सर्व मतदान केंद्रांवर सहायक पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी कर्मचाऱ्यांसोबत चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस उपअधीक्षक आंचल दलाल यांनी संवेदनशील अशा नागठाणे गावच्या मतदान केंद्रास भेट देऊन सर्व परिस्थितीची पाहणी केली. परंतु, बोरगाव पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवला असल्याने कोठेही अनुचित न प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले.