दिव्यांगांना मानसिक आधाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:41 AM2021-09-25T04:41:53+5:302021-09-25T04:41:53+5:30
मल्हारपेठ : दिव्यांगांना सहानुभूतीची नव्हे तर आधाराची खरी गरज आहे. त्यांच्यातील कौशल्याला प्रोत्साहन दिल्यास तेदेखील स्वावलंबी व सन्मानाने जगतील, ...
मल्हारपेठ : दिव्यांगांना सहानुभूतीची नव्हे तर आधाराची खरी गरज आहे. त्यांच्यातील कौशल्याला प्रोत्साहन दिल्यास तेदेखील स्वावलंबी व सन्मानाने जगतील, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
मल्हारपेठ, ता. पाटण येथे साहस डिसॅबीलीटी ॲन्ड रिसर्च केअर फाएंडेशनच्यावतीने कऱ्हाड व पाटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचा मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. नसिमा हुरजूक, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी व सन्मानाने जगता यावे यासाठी साहस फाउंडेशन विविध उपक्रम राबवत असल्याचे समाधान आहे. तसेच ही संस्था दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून देत स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील राहत असून ही बाब कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे दिव्यांगांना मोठा आधार मिळत आहे. साहस फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले हे कार्य उल्लेखनीय असून दिव्यांगांप्रती फाउंडेशनची असलेली सहानुभूती त्यांना उभे राहण्याचे नक्कीच बळ देईल.
साताराम पाटील, मधूताई पाटील, विजय पाटील, डॉ. अशितोष नांगरे, राजाराम कुंभार, डॉ. पूनम संकपाळ यांची उपस्थिती होती.
फोटो : २२केआरडी०२
कॅप्शन : मल्हारपेठ, ता. पाटण येथे दिव्यांगांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले.