विद्यार्थ्यांनीही श्रमदानातून तयार केली अंत्यसंस्काराची जागा; जिल्हावासीयांची मने हेलावली... आता पार्थिवाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 08:42 PM2020-01-02T20:42:05+5:302020-01-02T20:46:48+5:30

मराठा लाईट इन्फंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत नौशेरा (जम्मू सेक्टर) येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. ते सातारा जिल्'ातील क-हाड तालुक्यातील मुंढे गावचे रहिवासी आहेत. नववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह अन्य गस्ती चमूतील सहकारी तत्काळ सज्ज झाले.

The people of the district shook their minds ... now waiting for Parthiva | विद्यार्थ्यांनीही श्रमदानातून तयार केली अंत्यसंस्काराची जागा; जिल्हावासीयांची मने हेलावली... आता पार्थिवाची प्रतीक्षा

मुंढे-विजयनगर येथे अंत्यसंस्कार होणा-या ठिकाणची गुरुवारी शालेय विद्यार्थी आणि युवकांनी स्वच्छता करून चौथरा उभारण्यासाठी मदत केली. मुलीच्या नामकरणासाठी आलेल्या जवान संदीप आणि पत्नी सविता यांनी चिमुकलीला तळहातावर घेऊन फोटो काढला होता. (छाया : अरमान मुल्ला)

googlenewsNext
ठळक मुद्दे आज अंत्यसंस्कार

तांबवे : क-हाड तालुक्यातील मुंढे गावचे जवान संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्'ात शहीद झाले. सातारा जिल्'ासह गावकऱ्यांना त्यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा आहे. दीड महिन्याच्या छकुलीसह कुटुंबीयांनी आवंडा दाबून ठेवला असून, शुक्रवारी त्याला वाट मोकळी करून दिली जाईल. या शूरवीराच्या अंत्यविधीसाठी महाविद्यालयीन आणि शाळकरी मुलांनीही श्रमदान करून अत्यंविधीच्या जागेची स्वच्छता केली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता अंत्ययात्रा निघेल, त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास अंत्यविधी पार पडणार आहे.

मराठा लाईट इन्फंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत नौशेरा (जम्मू सेक्टर) येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. ते सातारा जिल्'ातील कºहाड तालुक्यातील मुंढे गावचे रहिवासी आहेत. नववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह अन्य गस्ती चमूतील सहकारी तत्काळ सज्ज झाले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या कळू शकत नव्हती. त्यामुळे नाईक संदीप यांनी आघाडीवर जात हल्ला चढवला. त्यादरम्यान झालेल्या गोळीबारात ते आणि नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले.

संदीप सावंत शहीद झाल्याची बातमी कळताच सर्वांचीच मने हेलावली. घरात मुलगी जन्माला आल्याचा आनंद कुटुंबीयांमध्ये केवळ दीड महिनेच टिकला. पंधरा दिवसांपूर्वीच संदीप यांनी मुलीच्या नामकरण विधीला उपस्थिती लावली होती. मोठ्या प्रेमाने त्यांनी आपल्या हातात घेऊन रिया हे नाव ठेवले. पुढील पंधरा दिवसांत या दोघांची ताटातूट होईल, असे कोणाला वाटलेच नसेल; पण नियती अशीच असते. केवळ पंधरा दिवसांच्या कालावधीतच बापलेकीची ताटातूट झाली. देशसेवेसाठी आयुष्य अर्पण केलेल्या संदीप यांनी कुटुंबाला निरोप दिला तो कायमचाच. त्यामुळे सर्वांचीच मने या तान्हुलीच्या आठवणीने आता हेलावत आहेत.
 

  • मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान

शहीद संदीप सावंत हे नऊ वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते. त्यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला असून, त्यांना दीड महिन्याची मुलगी आहे. १५ दिवसांपूर्वी बारसे करून संदीप ड्यूटीवर हजर झाले होत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. माझा मुलगा देशासाठी शहीद झाला, याचा अभिमान असल्याची भावना शहीद जवानचे वडील रघुनाथ सावंत यांनी व्यक्त केली.
 

  • अंत्यसंस्कार स्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

जेथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत, याची पाहणी कºहाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव, शहरचे पोलीस निरीक्षक गायकवाड, सातारा जिल्हा सैनिक अधिकारी कार्यालयातील फाटक व पवार यांनी केली.
 

  • महाविद्यालयीन अन् शाळकरी मुलांकडून चौथरा उभारण्यासाठी मदत

कºहाड-पाटण रस्त्यावर गुरुवारी सकाळपासून जेथे शहीद जवान संदीप सांवत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, तेथील वीट्टभट्टीच्या विटा व जागेची सफाई करण्याचे काम महाविद्यालयीन युवक व युवती, माध्यमिक विद्यालयातील मुले व गावातील आबालवृद्धांनी केले.
 

  • ... असा असेल अंत्ययात्रेचा मार्ग

१) शहीद जवान संदीप यांचे पार्थिव सकाळी आठ वाजता कºहाडच्या विजय दिवस चौक येथे येणार आहे.
२) विजय दिवस चौकातून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, दत्त चौक, शाहू चौक ते कोल्हापूर नाका
३) महामार्गावरून गोटे येथील नवीन बसथांबा
४) गोटेतून मुंढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळामार्गे मुंढे ग्रामपंचायत
५) ग्रामपंचायतीसमोरून मुंढेतील चव्हाण मळामार्गाने सावंत मळा येथील राहत्या घरी
६) एमएसईबी येथून कºहाड-पाटण रस्त्यानजीकच्या जागेत दहन.



 

 

Web Title: The people of the district shook their minds ... now waiting for Parthiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.