जनतेची अश्लील चेष्टा करणाऱ्यांना माफी नाही

By admin | Published: October 6, 2014 10:02 PM2014-10-06T22:02:10+5:302014-10-06T22:35:00+5:30

सदाभाऊ खोत : पुसेसावळी येथे मनोज घोरपडे यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी पक्षाच्या ‘धरणा’वर चर्चा

People do not apologize for pornography | जनतेची अश्लील चेष्टा करणाऱ्यांना माफी नाही

जनतेची अश्लील चेष्टा करणाऱ्यांना माफी नाही

Next

पुसेसावळी : ‘आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी २०१२ मध्ये महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्याच्या फक्त वल्गनाच केल्या. जनतेने पाणी मागितले तेव्हा कोरड्या धरणाचं नाव घेऊन अश्लील भाषेत बोलून कार्यकर्त्यांचे मनोरंजन व जनतेची चेष्टा केली. ती जनता आता तुम्हाला माफ करणार नाही,’ अशा भाषेत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी इशारा दिला.
पुसेसावळी, ता. खटाव येथील महात्मा गांधी विद्यालायाच्या प्रांगणात भाजपप्रणित व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी श्रीकांत पाटील, जगन्नाथ माने, पंढरीनाथ भाग्यवंत, भीमराव घोरपडे, अरविंद कांबळे, संजय शेडगे, विकास पवार, दीपक काटकर, सुनील पिसाळ, नारायण पिसाळ, दस्तगीर पटेल, अंकुश भोंड, सुबराव अवघडे, विवेक गायकवाड, अंकुश पाटील,सत्यवान कमाने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘कॉँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष वेगळे नाहीत. त्यांच्या सिंचन घोटाळ्यामुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही. हा सिंचन घोटाळा झाला नसता तर महाराष्ट्र हिरवागार दिसला असता. सिंचनात केलेला घोटाळा लपविण्यासाठी आत्मक्लेष केले, त्यावेळी दिवंगत चव्हाण यांना देखील रडू कोसळले असेल. हा भाग इंग्रजांबरोबर लढणाऱ्या क्रांतिकारकांचा आहे. या भागाला व महाराष्ट्राला लुटणाऱ्या सत्ताधाऱ्यांना गाडण्याचे काम करा.’
‘स्वाभिमानी शेतकरी संघटना जनतेच्या पे्रमावर उभी आहे. संघटनेचा कोणताच कार्यकर्ता गद्दार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष म्हणजे घोटाळ्यांचा कळस व अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी आहे. भाजप मित्रपक्षांचे शासन आल्यावर भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात जावेच लागणार आहे. महाराष्ट्राची प्रगती करायची असेल, तर पाच वर्षे सत्ता द्या. शेतकऱ्यांच्यासाठी किती गुन्हे दाखल झाले तरी शेतकऱ्यांची बाजू सोडणार नाही. आयुष्यभर बळीराजाची सेवा करणार आहे. भ्रष्ट राजकारण्यांची सत्ता उलथून टाकण्याची वेळ आता आली आहे. कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढविण्याची माझ्यात हिंमत आहे. सत्ताधाऱ्यांनो तुमच्यात आहे का?’ असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांच्यासाठी रक्त सांडण्याची तयारी असणाऱ्या मनोज घोरपडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन सदाभाऊ खोत यांनी यावेळी केले. (वार्ताहर)

पाणी प्रश्नाबाबत सत्ताधारी उदासीन : घोरपडे
मनोजदादा घोरपडे म्हणाले, ‘पाणी प्रश्नाबद्दल सत्ताधारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. सांगलीला जाणाऱ्या पाण्याबद्दल सत्ताधारी मौन पाळतात; पण खटावला पाणी मिळाल्याशिवाय आपण सांगलीला पाणी जाऊ देणार नाही. सत्ताधाऱ्यांनी कारखान्याच्या माध्यामातून सभासदांची फरफट चालवली आहे. सिंचनाच्या बाबतीत चौकशी लावली, तर सर्व भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल.’

Web Title: People do not apologize for pornography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.