जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतायत लोकांनी सतर्क राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:48 AM2021-02-20T05:48:05+5:302021-02-20T05:48:05+5:30

सातारा : ‘राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क ...

People should be vigilant as the number of corona patients is increasing in the district | जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतायत लोकांनी सतर्क राहावे

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतायत लोकांनी सतर्क राहावे

Next

सातारा : ‘राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे,’ असे आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात गुरुवारी कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षते खाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

रस्त्यावर विनामास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करुन गृहराज्यमंत्री देसाई पुढे म्हणाले, ‘कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी २० जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा.

नगरपरिषद व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता या विषयी जनजागृती करावी. सध्या १०० नागरिकांच्या उपस्थित लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत आहे; परंतु लग्न समारंभात ५०० ते १००० नागरिक उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेथे लग्न समारंभ होत आहे, तिथे भेट देऊन शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होते काय हे पहावे. पालन होत नसल्यास कारवाई करण्यात यावी. तसेच पोलीस विभागाने पेट्रोलिंगचे प्रमाण वाढविले पाहिजे, अशा सूचना देसाई यांनी शेवटी केल्या.

फोटो नेम : १९कलेक्टर

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित बैठकीत गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: People should be vigilant as the number of corona patients is increasing in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.