मराठी भाषेचे अमृत प्राशन केलेल्या व्यक्तींनी जगात इतिहास रचला : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:17 AM2021-02-28T05:17:46+5:302021-02-28T05:17:46+5:30

मलकापूर : आमची-तुमची सर्वांची लाडकी मायबोली म्हणून मराठी भाषेला वेगळे स्थान आहे. मराठी साहित्यिक, संत, कवी व लेखकांनी मराठी ...

People who consumed the nectar of Marathi language made history in the world: Pawar | मराठी भाषेचे अमृत प्राशन केलेल्या व्यक्तींनी जगात इतिहास रचला : पवार

मराठी भाषेचे अमृत प्राशन केलेल्या व्यक्तींनी जगात इतिहास रचला : पवार

Next

मलकापूर : आमची-तुमची सर्वांची लाडकी मायबोली म्हणून मराठी भाषेला वेगळे स्थान आहे. मराठी साहित्यिक, संत, कवी व लेखकांनी मराठी साहित्यातून समाजाला ज्ञानरूपी तत्त्वज्ञान प्रदान केलेले आहे. ते मराठी भाषेचे थोरपण आपण समजून घेतले पाहिजे. मराठी भाषेचे अमृत ज्या व्यक्तींनी प्राशन केले त्या व्यक्तींनीच जगात इतिहास रचला, असे गौरवोद्गार रंजना पवार यांनी काढले.

येथील श्रीमळाई देवी शिक्षण संस्था संचलित आ. च. विद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला. यावेळी आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य एस. वाय. गाडे म्हणाले, विद्यार्थिदशेत आपल्याला जिथे व्यक्त होण्याची संधी मिळते, त्या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने भाषण स्पर्धेमध्ये आपले नाव पहिल्यांदा गेले पाहिजे. हीच तुमच्यासाठी चालून आलेली संधी होईल.

मराठी विषय शिक्षिका एस. आर. भोरे यांनी मराठी भाषा किती समृद्ध आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, तर एम. पी. फराळे यांनी मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करावा, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य एस. वाय. गाडे यांच्यासह उपमुख्याध्यापक एस. बी. शिर्के, पर्यवेक्षक अनिल शिर्के, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगराव देसाई यांनी केले. सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी सुफिया सय्यद हिने केले, तर अनिल शिर्के यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: People who consumed the nectar of Marathi language made history in the world: Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.