Lok Sabha Election 2019 सत्ताधाऱ्यांना जनता माफ करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:12 PM2019-04-18T23:12:12+5:302019-04-18T23:12:39+5:30

वाई : ‘मोदी सरकारच्या काळात कवडीमोल भावाने कृषी माल विकावा लागला. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य ...

People will not forgive MPs for the 2019 elections | Lok Sabha Election 2019 सत्ताधाऱ्यांना जनता माफ करणार नाही

Lok Sabha Election 2019 सत्ताधाऱ्यांना जनता माफ करणार नाही

Next

वाई : ‘मोदी सरकारच्या काळात कवडीमोल भावाने कृषी माल विकावा लागला. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सबका विकास सर्वसामान्य जनतेचा सत्यानाश, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खोटी आश्वासने देऊन तरुणांना देशोधडीला लावणाºया मोदी सरकारला जनता कदापिही माफ करणार नाही,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
वाई येथील साठे धर्मशाळेत काँग्रेसच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, विकास शिंदे, प्रतापराव देशमुख, व्याजवाडीचे माजी सरपंच संतोषराव पिसाळ, मानसिंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, महिला तालुकाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस मंजिरी पानसे, खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदना धायगुडे, वाई पंचायत समिती माजी सभापती सुनीता शिंदे, भाऊसाहेब शेळके, अतुल पवार, गुरुदेव बरदाडे, अजय धायगुडे, प्रदीप जायगुडे, विजयराव भिलारे, मुन्नाभाई वारुंगकर, मदन ननावरे, रवींद्र भिलारे, जयदीप शिंदे, विक्रम वाघ, विलास पिसाळ, सदाशिव अनपट उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, ‘लोकसभेची निवडणूक वाई विधानसभा मतदार संघाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. मोदी सरकारने एक रुपयाचाही निधी सातारा जिल्ह्याला दिला नाही. उलट शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव देऊन शेतकरीच उद्ध्वस्त केला. देशात तरुणांची बेरोजगारी वाढली आहे.’
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘शेतकºयांच्या खोट्या विकासाच्या नावाखाली मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार मोदी सरकारला नाही. त्यांनी केलेल्या नतभ्रष्ट कारभाराचा जाब विचारल्याशिवाय जनता राहणार नाही.’
प्रदीप जायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप शिंदे यांनी आभार मानले.

विरोध करणाºयांनी आमदार होऊन दाखवावे
किसन वीर कारखाना वाचविण्यासाठी व वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मदन भोसले यांनी तालुक्यातील काँग्रेस संपविण्याची भाषा बोलत ‘टोलनाक्यावर जाणारे नकोत, संसदेत जाणारे उमेदवार हवेत,’ अशी टीका केली. भाजपमध्ये आमदार होऊन दाखवा, मगच खालच्या पातळीवर जाऊन टीका करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम मार्गी लावता आले नाही. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका विकास शिंदे यांनी केली.

Web Title: People will not forgive MPs for the 2019 elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.