शेंद्रेत जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:33+5:302021-04-22T04:40:33+5:30
शेंद्रे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेंद्रे ग्रामस्थांनी १७ एप्रिलपासून जनता कर्फ्यू पाळण्याचे नियोजन केले आहे. या ...
शेंद्रे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेंद्रे ग्रामस्थांनी १७ एप्रिलपासून जनता कर्फ्यू पाळण्याचे नियोजन केले आहे. या जनता कर्फ्यूला शेंद्रेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जनता कर्फ्यूमुळे परिसरातील सर्व व्यवहार बंद असून सर्व व्यावसायिकांनीही आपली दुकाने बंद ठेवली आहेत.
पाठीमागील काही दिवसांत शेंद्रे गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यावर आळा घालण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेंद्रे ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यूचे नियोजन केले आहे. या जनता कर्फ्यूमुळे शेंद्रे गावाच्या कायम गजबजलेल्या झेंडा चौकात एकदम शुकशुकाट आहे. यामुळे शेंद्रे गावात कमालीची शांतता असून, या जनता कर्फ्यूमध्ये शेंद्रे ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
२१शेंद्रे
फोटो :
शेंद्रे, ता. सातारा येथील कायम गजबजलेल्या झेंडा चौकात जनता कर्फ्यूमुळे सर्वत्र शुकशुकाट आहे.