बियाणे खरेदीसाठी परवानगी, पण वाहने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:07+5:302021-06-02T04:29:07+5:30

............. सध्या सर्व अत्यावश्यक सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरात धान्य उपलब्ध आहे; पण ...

Permission to purchase seeds, but off the vehicles | बियाणे खरेदीसाठी परवानगी, पण वाहने बंद

बियाणे खरेदीसाठी परवानगी, पण वाहने बंद

Next

.............

सध्या सर्व अत्यावश्यक सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरात धान्य उपलब्ध आहे; पण गिरणी बंद असल्यामुळे खायचे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आता तर आणखी आठ दिवस सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. सकाळी काही वेळापुरती अत्यावश्यक सेवा सुरू करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे.

...............

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अनेक दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. एक माणुसकी म्हणून दुकानदारांनी त्यांना दुकान उघडून वस्तू दिलेल्या असतात. अशाच वेळी पोलिसांनी पाहिल्यानंतर दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; मात्र अगोदरच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यातच अशा प्रकारे पोलिसांनी दुकानदारावर गुन्हे दाखल केल्याने आणखीनच व्यावसायिक गर्तेत सापडले आहेत. पोलिसांनी अशा वेळी तरी सहानुभूतीने विचार करावा, अशी मागणी आता दुकानदारांमधून होऊ लागलीय.

Web Title: Permission to purchase seeds, but off the vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.