ऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर नवीन कोविड हॉस्पिटलला देणार परवानगी : शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:02 AM2021-05-05T05:02:59+5:302021-05-05T05:02:59+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यात एकूण २० खासगी हॉस्पिटल्सच्या प्रशासनाने त्यांच्याकडील सुरू असलेले हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये ...

Permission will be given to new Kovid Hospital after availability of oxygen: Shinde | ऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर नवीन कोविड हॉस्पिटलला देणार परवानगी : शिंदे

ऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर नवीन कोविड हॉस्पिटलला देणार परवानगी : शिंदे

Next

सातारा : सातारा जिल्ह्यात एकूण २० खासगी हॉस्पिटल्सच्या प्रशासनाने त्यांच्याकडील सुरू असलेले हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकतेनुसार उपलब्धता झाल्यास या सर्व २० खाजगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्याबाबत तात्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये मिळून एकूण ८२ हॉस्पिटलमध्ये आजरोजी १६ हजार ६२६ इतके कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी १२ हजार ४४७ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. एकूण ८२ हॉस्पिटल्सपैकी ५८ खाजगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांत दैनंदिन लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, तसेच अत्यावश्यक रुग्णांना उपचाराकरिता आवश्यक असणारे रेमडेसिविर इंजेक्शनसुद्धा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत वरिष्ठ कार्यालय आणि शासनस्तरावर ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्याकरिता युद्धपातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकरच सातारा जिल्ह्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध होतील, असेही प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Permission will be given to new Kovid Hospital after availability of oxygen: Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.