जिद्द, चिकाटी हाच यशाचा राजमार्ग : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:25+5:302021-06-09T04:48:25+5:30
पाचवड : ‘विवेकी विचारांच्या आधाराने आपले उद्दिष्ट साध्य होऊ शकते, मात्र त्यासाठी हवी असते ती जिद्द आणि चिकाटी,’ असे ...
पाचवड : ‘विवेकी विचारांच्या आधाराने आपले उद्दिष्ट साध्य होऊ शकते, मात्र त्यासाठी हवी असते ती जिद्द आणि चिकाटी,’ असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शरद पवार यांनी विवेक वाहिनीच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाइन व्याख्यानप्रसंगी बोलताना केले.
पवार म्हणाले, ‘उंच माझा झोका ग’ या ध्येयाने अपंगांचे पुनर्वसन करणाऱ्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी नसिमा हुरजूक यांचे कार्य या दृष्टीने उल्लेखनीय आहे. त्यांचे ‘चाकाची खुर्ची’ हे आत्मकथन वाचनीय आहे.
प्रभारी प्राचार्य डॉ. प्रदीप शिंदे म्हणाले, ‘दैववाद किंवा कर्मकांडांना महत्त्व न देता विवेकाच्या आधारे व्यक्तींनी आपला विकास साधला पाहिजे. स्वतःचा विकास म्हणजे पर्यायाने तो समाजाचा विकास असतो.’ विवेक वाहिनी समितीच्या वतीने समन्वयक प्राध्यापिका राणी शिंदे यांनी व्याख्यानाचे आयोजन केले, तर कार्यक्रमाचे जिमखाना विभागप्रमुख स्मिता कुंभार यांनी आभार मानले.