संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बदलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:57 PM2018-05-20T22:57:26+5:302018-05-20T22:57:26+5:30

The person who tries to change the constitution will change | संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बदलू

संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बदलू

Next


कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
पुणे येथे रविवार, दि. २७ रोजी होणाºया महाअधिवेशनाच्या तयारीकरिता पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांचा नियोजन मेळावा रविवारी कºहाड येथे यशवंतराव चव्हाण बचत भवन सभागृहात पार पडला. याप्रसंगी राज्यमंत्री आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे विवेक कांबळे, हणमंतराव साठे, प्राचार्य शहाजी कांबळे, अशोकराव मदने, आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, जयवंत विरकायदे, किशोर तपासे, कºहाड तालुकाध्यक्ष युवराज काटरे, राजू गवळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री आठवले पुढे म्हणाले, ‘‘भाजप जातीयवादी असल्याचं बोललं जातंय. नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्याबद्दल चांगलं बोलताहेत. संविधान बदलणार नाही. दलितांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे ओरडून सांगताहेत. मात्र, काही विरोधी पक्षातील लोक भाजपवाले असे करतील तसेच करतील, असे सांगत आहेत. आरपीआय हा मोठा पक्ष आहे. या पक्षात हिंदू, मराठा, मुस्लीम, ख्रिश्चन अशा विविध धर्मांतील लोक आहेत. त्यामुळे आपण एकमेकांशी भांडत न बसता एकत्रित राहिले पाहिजे. आरपीआयची ताकद वाढविली पाहिजे. आरपीआय हा संभाजी भिडे यांच्या बाजूने नाही. संभाजी भिडे यांना अटक झालीच पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे. डॉ. बाबासाहेबांनी जोडण्याची भूमिका सांगितली आहे, तोडण्याची नाही. खरे मित्र बनवणे हीच खरी आपली चळवळ आहे.’
मेळाव्यापूर्वी राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कºहाड तालुका आरपीआय संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज काटरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यानंतर राज्यमंत्री आठवले यांनी कºहाड येथील बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मी मंत्री झाल्यापासून त्यांच्या पोटात गोळा
माझ्या मंत्रिपदाकडे लागला आहे डोळा... कारण मी मंत्री झाल्यापासून त्यांच्या पोटात उठलाय गोळा... जर खराच असशील तू भीमाच्या बाळा... तर लाव ना तू जातीयवादी लोकांच्या तोंडाच्या काळा... अशा मार्मिक कवितेच्या माध्यमातून नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांच्यावर मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.

Web Title: The person who tries to change the constitution will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.