विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालविणे कसे परवडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:30+5:302021-07-31T04:38:30+5:30
सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : विमानासाठी ५६ रुपयांत पेट्रोल देता येते मात्र आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुचाकी ...
सागर गुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : विमानासाठी ५६ रुपयांत पेट्रोल देता येते मात्र आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुचाकी चालविणाऱ्या सर्वसामान्यांना हेच पेट्रोल तब्बल १०८ रुपये प्रतिलीटर दराने मिळते. विमान कंपन्यांना इंधन करात सूट दिली असली तरी सर्वसामान्यांच्या बोकांडी कराचा बोजा ठेवला जात आहे.
विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाला ‘ए. टी. एफ.’ असे म्हणतात. या इंधनापेक्षाही आपल्या वाहनांमध्ये वापरले जाणारे पेट्रोल दुप्पट महाग आहे. विमान कंपन्यांचा विचार शासन करते मात्र सर्वसामान्यांचा विचार केला जात नाही. विमानासाठी वापरले जाणारे पेट्रोल गरिबांसाठी वापरले जाते का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. विमान कंपन्यांना जर कमी दरात पेट्रोल देता येत असेल तर सर्वसामान्यांना का दिले जात नाही? असा प्रश्नही विचारला जात आहे. शासनाने इंधनावरील कर तत्काळ कमी करुन पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी केली जात आहे.
असा मथळा आपल्याला करता येईल.
१) या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
हा बघा फरक ! (दर प्रतिलीटर)
विमानातील इंधन ए. टी. एफ. - ५६ रुपये
पेट्रोल - १०८ रुपये
२) शहरातील पेट्रोल पंप - ३०
दररोज लागणारे पेट्रोल - १ लाख २० हजार
३) शहरातील वाहनांची संख्या : १ लाख ७ हजार ३००
दुचाकी - ७० हजार ४००
चारचाकी - ५३ हजार१००
४) कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी लागतात हजार
अल्पावधीमध्ये पेट्रोलचा दर गगनाला भिडला आहे. कोरोना काळात रोजगार टिकून असला तरी वाहनाचा खर्च वाढला आहे. कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा पेट्रोलचा खर्च वाढला आहे. ज्याठिकाणी ५०० रुपयांत महिना निघायचा तिथे हजार रुपयांचे पेट्रोलही महिन्याला पुरत नाही.
५) पगार कमी, खर्चात वाढ
कोट..
कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. कंपनीने १० टक्के पगारकपात केलेली आहे. स्थिती पूर्ववत झाल्यानंतर १० टक्के दिले जातील, असे सांगण्यात येते. आता कमी पगारात महिना काढायचा असल्याने दुचाकी घरी ठेवूनच कामाला जात आहे.
- संतोष सपकाळ
कोट...
कोरोनाचे लॉकडाऊन कधीही होत असल्याने कंपनी बंद पडली होती. आम्हाला सक्तीने रजेवर जावे लागले. घरात बसून होतो, तेव्हा गाडी वापरतच नव्हतो. आता काम सुरु झाले आहे. मात्र, कंपनी घरापासून लांब असल्याने दुचाकी वापरावी लागते.
- किरण कुलकर्णी