फलटण शहरातील कुत्र्यांवर ‘संक्रांत’!

By admin | Published: January 15, 2016 11:00 PM2016-01-15T23:00:40+5:302016-01-16T00:30:10+5:30

विषारी पदार्थ खाऊ घातले : चार दिवसांत १५ मृत्युमुखी; संबंधितांवर कारवाईची मागणी

Phaltan dogs in the city 'Sankranta'! | फलटण शहरातील कुत्र्यांवर ‘संक्रांत’!

फलटण शहरातील कुत्र्यांवर ‘संक्रांत’!

Next

नसीर शिकलगार -- फलटण शहरातील कुत्र्यांवर कोणीतरी अज्ञातांनी वक्रदृष्टी फिरवली आहे. त्यांना विषारी पदार्थ खायला घातल्याने अनेक ठिकाणी भटकी व पाळीव कुत्री मृतावस्थेत आढळून येत
आहेत. कुत्र्यांवर संक्रांत आणणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक व प्राणीमित्र संघटनांकडून होत आहे. दरम्यान, चार दिवसांत १५ हून
अधिक कुत्री मृत्युमुखी पडली
आहेत.
फलटण शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या जनावरांची संख्या वाढलेली आहे. त्यामध्ये कुत्री, डुकरे, गाढवे, गाई यांचा समावेश आहे. मोकाट जनावरांचा सामान्य जनतेला त्रास होत असतोच; मात्र या मोकाट जनावरांवर अंकुश लावण्याचे काम नगरपालिकेचे आहे. मोकाट जनावरांविषयी अनेक तक्रारी नगरपालिकेकडे करूनही ते दखल घेताना कधी दिसले नाही. शहरात भटक्या कुत्र्यांबरोबरच पाळीव कुत्र्यांचीही मोठी संख्या
आहे.
यातील काही पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे मध्यंतरी अनेकांना उपचार घ्यावे लागले होते. मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत. कुत्री पकडून इतरत्र सोडणे किंवा कुत्र्यांची नसबंदी असे अनेक प्रकार आहेत. मात्र, सध्या शहरात दिसेल त्या कुत्र्यांना मारण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहे. दिसले कुत्रे की त्याला विषारी औषध असलेले अन्नपदार्थ खायला द्यायचे. हे विषारी औषध खाल्ल्यावर मृत्यू पावल्याचे अनेक उदाहरणे तीन-चार दिवसांत घडली आहेत.
यामध्ये पाळीव कुत्र्यांबरोबरच लहान-लहान कुत्रीही मृत पावल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत १५ हून अधिक कुत्री मृत्युमुखी पडली असून, या संदर्भात नागरिकांनी नगरपालिकेकडे चौकशी केली असता मोकाट जनावरांसंदर्भात कोणतीच
मोहीम सुरू नसल्याचे सांगण्यात आले. कुत्र्यांना मारण्याच्या प्रकारामागे कोण विकृत आहे. याचा शोध घ्यावा. मारणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. यासंदर्भात संबंधितांकडे तक्रारी करण्यात येणार आहेत.


नगरपालिकेचा संबंध नाही
फलटण शहरात कुत्र्यांना मारण्याचे जे प्रकार सुरू आहेत, त्याच्याशी नगरपालिकेचा कोणताही संबंध नाही. नगरपालिकेकडून मोकाट जनावरांसंदर्भात कोणतीच कारवाई सध्या सुरू नाही. मृत पडलेली कुत्री फक्त नगरपालिकेचे कर्मचारी उचलून नेत आहेत.
- यशवंत डांगे, मुख्याधिकारी

कुत्र्यांना मारणाऱ्यांचा शोध घ्यावा
कोणीतरी अज्ञातांनी दृष्टवृत्तीने लहान-मोठी कुत्री मारून माणुसकीला काळिमा फासला आहे. जो कोणी कुत्र्याला मारीत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. या संदर्भात मी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तक्रार घेतली नाही. या प्रकाराबाबत विविध सामाजिक व प्राणीमित्र संघटनाकडे तक्रार करणार आहे.
- शिवाजी भोई, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Phaltan dogs in the city 'Sankranta'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.