फलटणच्या एसटीनं केली अखेर अपघाताची हॅटट्रिक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:40 PM2017-08-28T23:40:27+5:302017-08-28T23:40:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : फलटण एसटी आगाराच्या एसटी बसची अपघातांची मालिका सुरू असून, बुधवारी एसटीने अपघाताची हॅटट्रिक पूर्ण केली. फलटणहून पिसुरडीकडे निघालेल्या बसला कारने धडक दिल्याने कार रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकली. या अपघातात पाचजण किरकोळ जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटणहून एसटीबस पिसुरडी (ता. पुरंदर)कडे निघाली होती. पिसुरडी येथे सायंकाळी ६.३० च्या सुमारास पाठीमागून आलेल्या कारने एसटीच्या मागील चाकास जोरदार धडक दिली. या धडकेनंतर एसटी रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकली. एसटीमध्ये एकूण ३० प्रवासी होते. यांपैकी पाचजण किरकोळ जखमी झाले.
अपघातात कारची चाके निखळली तर एसटी बसचेही नुकसान झाले. फलटण आगाराच्या एसटीचा सलग तिसºया दिवशीही अपघात झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.