फलटणला आज राजकीय ‘दंगल’

By admin | Published: February 6, 2017 12:52 AM2017-02-06T00:52:02+5:302017-02-06T00:52:02+5:30

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : दोन्ही काँग्रेसतर्फे शेवटच्या क्षणी अर्ज भरणार

Phaltan today's political "riot" | फलटणला आज राजकीय ‘दंगल’

फलटणला आज राजकीय ‘दंगल’

Next

फलटण : राजकीय उलथापालथीसाठी प्रसिद्ध असलेल्या फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही उलथापालथ होते का? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही काँग्रेस आपली उमेदवारी यादी शेवटच्या दिवशी प्रसिद्ध करणार असल्याने कोण-कोण बंडखोरी करतोय की पक्ष बदल करतोय, याची उत्सुकता ताणली आहे.
फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विविध पक्ष राजकीय समीकरणे जुळविण्यात व्यस्त आहे. शेवटच्या दिवसापर्यंत काय घडामोडी घडतील, याचा नेम नसल्याने आतापर्यंत दिसून आले आहे. एका निवडणुकीला एक, दुसऱ्या निवडणुकीला दुसरे तर तिसऱ्या निवडणुकीला तिसरे समीकरण जुळविण्याचा इतिहास या तालुक्याचा आहे.
फलटण तालुक्यावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हाती गेल्या २५ वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. या सत्तेला छेद देण्याचा प्रयत्न विरोधकांच्या एकीअभावी आतापर्यंत यशस्वी झालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांची महाआघाडी बनविण्याचा घाट घालण्यात आला होता. सर्व विरोधकांची महाआघाडी व्हावी, यासाठी जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत व कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. अनेक बैठका घेतल्या; मात्र जागावाटप व चिन्हावरच निवडणुका लढविण्याचा आग्रहामुळे अस्तित्वात येऊ लागलेल्या महाआघाडीत बिघाडी झाली व सर्वांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घोषित केला आहे. फलटण तालुक्यातील प्रमुख दोन पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच नव्याने तालुक्याच्या राजकारणात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाने आपली उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. भाजपाने गिरवी जिल्हा परिषद मतदार संघातून सह्याद्री कदम यांची उमेदवारी फक्त जाहीर केली आहे. मात्र, अंतिम यादी जाहीर करण्यास सर्वांनीच टाळाटाळ केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांचा मोठा भरणा आहे. तीच परिस्थिती काँग्रेसची असल्याने यादी शेवटच्या दिवशीच जाहीर होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या व माजी पंचायत समितीचे उपसभापती पुष्पाताई सस्ते यांनी बंडखोरी करीत साखरवाडी जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये बंडखोरांवर भाजपची नजर असून, शेवटच्या दिवशी बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी

Web Title: Phaltan today's political "riot"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.